पत्रकारांमुळे समाजातील चुकीच्या गोष्टींना अटकाव बसतो – प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले | Journalists prevent wrongdoing in society – Dr. Ajit Thorbole

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 9 जानेवारी । समाजासाठी निस्वार्थपने काम करणारा पत्रकार हा घटक आहे. कोणतेही अपेक्षा न करता समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम पत्रकार करीत आहेत. समाजाची वर्तमान स्थिती प्रत्यक्षात मांडण्याचे कार्य कर्जतचे पत्रकार उत्तम पार पाडतात. पत्रकारांमुळे चुकीच्या गोष्टींना अटकाव बसला जात आहे. पत्रकारांचा सन्मान होणे ही त्यांच्या कामाची पावती आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले (Prantadhikari Dr. Ajit Thorbole) यांनी केले.

कर्जत रोटरी क्लबच्या (Karjat Rotary Club) वतीने पत्रकार दिनाच्या औचित्य साधून कर्जत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डाॅ अजित थोरबोले बोलत होते.

लेखणीद्वारे समाजाचे प्रश्न तडीस लावण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करीत असून “पत्रकार दिनी” सन्मान करणे आमचे भाग्य समजतो. समाजासाठी निस्वार्थीपणे काम पत्रकार उत्तम पार पाडत आहे असे प्रतिपादन रोटरीचे अध्यक्ष रामदास काळदाते यांनी केले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, सचिव राजेंद्र जगताप, निवृत्त वन अधिकारी अनिल तोरडमल, डॉ मधुकर काळदाते, डॉ संदीप काळदाते, पत्रकार संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना काळदाते म्हणाले की, पत्रकारांमुळेच समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीना पायबंद बसला जातो. पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंचित, दिन-दुबळ्यांना न्याय देण्याचे काम करत आहे. त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हास मिळते याचे समाधान आहे.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले म्हणाले, ज्यावेळी राज्यास, देशात यासह समाजात कुठे गरज निर्माण होईल तेव्हा सर्वप्रथम रोटरीकडून मदतीचा पहिला हात पुढे येतो. आज रोटरीचे सदस्यत्व देण्यात आले याबद्दल आपण रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे आभार मानतो.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते सुभाष माळवे, कर्जत तालुका पत्रकार संघाचे सचिव डॉ अफरोजखान पठाण, उपाध्यक्ष निलेश दिवटे, माजी अध्यक्ष मोतीराम शिंदे, मुन्ना पठाण, दिलीप अनारसे, सामनाचे उपसंपादक बळे यांच्यासह रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा विशाल मेहत्रे, नितीन तोरडमल, सुरेश नहार, दयानंद पाटील, घनश्याम नाळे, संदीप गदादे, सदाशिव फरांदे, राजेंद्र पठाडे, नितीन देशमुख, अभय बोरा, उपमन्यू शिंदे, उत्तम मोहळकर, श्रीराम गायकवाड, डॉ विजय चव्हाण, नारायण तनपुरे, नामदेव गायकवाड, सचिन धांडे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र राऊत यांनी केले तर आभार सचिव राजेंद्र जगताप यांनी मानले.