घटनेने धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणात त्रुटी असल्यास, संसदेच्या विशेष अधिवेशनात त्या दुर करून तात्काळ आरक्षण लागु करावे – आमदार प्रा राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 09 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावे ही धनगर समाजाची मागणी आहे. गेल्या 70 ते 75 वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज लढत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दुर करून धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी श्री क्षेत्र चोंडी येथे बोलताना केली.

If there is an error in the reservation given to Dhangar community by the constitution, it should be removed in a special session of Parliament and immediate reservation should be implemented - MLA Prof. Ram Shinde

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता.जामखेड) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनाला आमदार प्रा राम शिंदे यांनी आज 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील, आण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितिन धायगुडे यांची भेट घेतली.

यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर अंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस पांडूरंग उबाळे, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, उपसरपंच कल्याण शिंदे, बाबासाहेब शिंदे पाटील, उमेश रोडे, आप्पासाहेब उबाळे, सतिश शिंदे, प्रकाश गलांडे, आलेश शिंदे, सुजित शिंदे, रावसाहेब खरात, दत्ता शिंदे, सह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, धनगर समाजाला घटनेतील आरक्षण तातडीने लागू करावं, संसदेच्या विशेष अधिवेशनात हा विषय मार्गी लावावा या मागणीसाठी श्री क्षेत्र चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे.त्यांच्या सर्व मागण्या समजून घेतल्या. गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमांतून आरक्षणासाठी अंदोलन होत आहेत. त्यामाध्यमांतून धनगर समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला पाहिजे.

धनगर समाजाला गेल्या अनेक दिवसांपासून नुसते अश्वासने दिली जात आहेत. अनेक पक्षांचे प्रमुख असतील, नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी धनगर समाजाच्या संदर्भामध्ये अत्तापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. हा समाजाचा आक्रोश आहे. रोष आहे. त्यामुळे तातडीने धनगर समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे. कायदेशीर त्यांच्या कोणत्या बाजू आहेत. कोणत्या त्रुटी आहेत. त्या त्रुटी तातडीने केंद्र आणि राज्य सरकारने दुर केल्या पाहिजेत. ही धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.