गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केली 42 शिक्षकांची दिवाळी गोड, पोळ यांच्या निर्णयाचे शिक्षकांमुळे होत आहे स्वागत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  दीपावलीच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील 42 शिक्षकांना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मोठी भेट दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला महत्वाचा प्रश्न यामुळे मार्गी लागला आहे. जामखेड तालुक्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणीचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर प्रलंबित होता. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न हातात घेऊन दि. 09 नोव्हेंबर 2023 रोजी 42 शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Group Development Officer Prakash Pol  Diwali gift for 42 teachers, teachers are welcoming Pol's decision,

शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना होते. परंतु त्यांच्याकडील जिल्ह्याच्या कामाचा व्याप पाहता त्यांनी आपले अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान केले. यानंतर जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व शिक्षकांची सेवा पुस्तके अद्ययावत केली. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव तपासून 42 शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आहे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी 42 शिक्षकांची दिवाळी गोड केली.

शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी मंजूर करण्याच्या प्रक्रियेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, अधीक्षक चौसाळकर, विस्तार अधिकारी जाधव, वरिष्ठ सहायक प्रताप गांगर्डे, कनिष्ठ सहायक सुरज मुंडे, नरवणे यांचे सहकार्य लाभले.

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मागील दोन वर्षात १२५ शिक्षकांची ८५ लाख रु ची वैद्यकीय देयके त्यांच्या खात्यात जमा केली. शिक्षकांची सेवा पुस्तके अद्ययावत केली. जिल्हा परिषदेच्या ५२ शाळांना वॉल कंपाउंड मंजूर दिले आहे. २९ शाळांना शौचालय मंजूर केले आहे. मागील २ वर्षात शाळांचा भौतिक विकास आणि गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जामखेडमधील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. बीडीओ प्रकाश पोळ यांनी शिक्षण क्षेत्रात हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.