मोठी बातमी : धनगर बांधवांनो, ‘या’ दोन पक्षांकडे पाठ फिरवा, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात यशवंत सेना झाली आक्रमक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख ।  धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. गेल्या 20 दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. दोन्ही उपोषकर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उपोषणाच्या 20 व्या दिवशी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे या दोन पक्षांकडे धनगर समाज बांधवांनी अगामी मतदानाच्या वेळी पाठ फिरवण्याचे अवाहन करत जोरदार हल्ला चढवला.

Dhangar brothers, turn your back on 'these' two parties at the time of polls, Yashwant Sena aggressive against Congress and Shiv Sena Thackeray group, chondhi uposhan latest news,

धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी यशवंत सेनेच्या वतीने श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात गेल्या वीस दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले आहे.यशवंत सेनेच्या वतीने बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांडगे, आण्णासाहेब रुपनर, सुनील बंडगर, नितीन धायगुडे, अक्षय शिंदे, समाधान पाटील, हे सर्वजण उपोषणाला बसले आहेत.या अंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Dhangar brothers, turn your back on 'these' two parties at the time of polls, Yashwant Sena aggressive against Congress and Shiv Sena Thackeray group, chondhi uposhan latest news,

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील धनगर बांधव, विविध राजकीय पक्षांचे नेते,  आमदार, खासदार चोंडीतील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवत आहेत. परंतू यशवंत सेनेने हाती घेतलेल्या या अंदोलनाकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे. याचे पडसाद आज अंदोलनस्थळी उमटले. यशवंत सेनेने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा निषेध नोंदवला.

यावेळी बोलताना बाळासाहेब दोडतले म्हणाले की, हे अंदोलन सुरू करताना कोणत्याही पक्षाच्या विरोधात नव्हतं, कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतं, हे अंदोलन धनगर समाजाच्या गेल्या 75 वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात हे अंदोलन आहे. धनगर समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांना न्याय मिळावा यासाठी हे अंदोलन हाती घेतलं आहे. आमरण उपोषणाचं अंदोलन सुरू केल्यानंतर राज्यातील बड्या बड्या नेत्यांनी याच्याकडे पाठ फिरवली आहे. त्या नेत्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, त्यांना धनगर समाजाचं काही देणं घेणं नाही असे वाटणार्‍यांपैकी काँग्रेसचा एकही नेता अंदोलनाकडे फिरकला नाही, याचा अर्थ धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न समजून घ्यायची मानसिकता काँग्रेसची नाही, असे स्पष्ट होते अशी खरमरीत टीका दोडतोले यांनी यावेळी केली.

Dhangar brothers, turn your back on 'these' two parties at the time of polls, Yashwant Sena aggressive against Congress and Shiv Sena Thackeray group, chondhi uposhan latest news,

काँग्रेस बरोबरच शिवसेना ठाकरे गटाचा एकही नेता चोंडी येथे सुरू असलेल्या अंदोलनाकडे फिरकला नाही. परभणीचे खासदार बंडू जाधव हे आले होते कारण उपोषणकर्ते सुरेश बंडगर हे परभणीचे आहेत. त्यामुळे ते कदाचित येऊन भेटून गेले असतील, अन्यथा राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचा एकही मोठा नेता आमची भेट घ्यायला  फिरकला नाही, याचा आम्ही निषेध नाही तर तीव्र असा जाहिर निषेध नोंदवतो. याच्यापेक्षा आणखीन काही शब्द असतील तर त्या शब्दांत आम्ही निषेध नोंदवतो, असा जोरदार हल्लाबोल यावेळी दोडतोल यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटावर केला.

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात यशवंत सेना आक्रमक

पुढे बोलताना ते म्हणाले की, धनगर बांधवांच्या जीवावर काँग्रेसचे नेते मोठे मोठे झाले, ज्या धनगर बांधवांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली, त्या शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने धनगर बांधवांच्या प्रश्नाकडे शंभर टक्के पाठ फिरवली, येणाऱ्या काळामध्ये धनगर बांधवांनो या दोन्ही पक्षाकडे तुम्हीही मतदानाच्या वेळेस पाठ फिरवा, असे अवाहन यावेळी यशवंत सेनेच्या बाळासाहेब दोडतले यांनी केले आहे.

Dhangar brothers, turn your back on 'these' two parties at the time of polls, Yashwant Sena aggressive against Congress and Shiv Sena Thackeray group, chondhi uposhan latest news,

दरम्यान, धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी, यासाठी चोंडीत आमरण उपोषण करणाऱ्या यशवंत सेनेच्या अंदोलकाकडे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी पाठ फिरवल्याने यशवंत सेना या दोन्ही पक्षांविरोधात आक्रमक झाली आहे.राज्यात दोन्ही पक्षांविरोधात काय पडसाद उमटतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमदार नारायण कुचे यांचा अंदोलनास पाठिंबा

दरम्यान, आज जालना जिल्ह्यातील बदनापुरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी चोंडी येथील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधत उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत बदनापूर मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते चोंडीला आले होते.

आमदार प्रा राम शिंदे यांनी घेतली अंदोलकांची भेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील वंशज राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे हे चोंडी येथे धनगर आरक्षणप्रश्नी सुरु असलेल्या उपोषणाच्या अंदोलनास सातत्याने भेट देत आहेत.अंदोलकांशी चर्चा करत आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारामुळेच चोंडी येथील अंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले गेले. सरकारने अंदोलकांशी चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली. महाजन यांनी चोंडीत येऊन अंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत चोंडीतील अंदोलक, राज्यातील धनगर समाजातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठोस तोडगा निघाला नाही, परंतू अंदोलकांच्या मागणीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात झाली.

Dhangar brothers, turn your back on 'these' two parties at the time of polls, Yashwant Sena aggressive against Congress and Shiv Sena Thackeray group, chondhi uposhan latest news,

मुंबईतील बैठकीनंतर चोंडीतील अंदोलक व सरकार यांच्यात पुन्हा सकारात्मक चर्चा व्हावी, अंदोलनावर ठोस तोडगा निघावा, यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी आज (25 रोजी) पुन्हा एकदा चोंडीतील अंदोलकांची भेट घेतली.सविस्तर चर्चा केली. अंदोलकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचवले.लवकरच सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.