शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचा जीवाला धोका ?, पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी सांगितला घटनाक्रम, नेमकं काय घडलं ? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांचा जीव धोक्यात असल्याचे समोर आले आहे.अंधारे यांनी याबाबत स्वता: पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. आपल्याला अप्रत्यक्ष धमक्या येत असल्याचे अंधारे यांनी सांगितले आहे.अंधारे यांच्यासमवेत शिवसेना नेते अरविंद सावंत खासदार राजन विचारे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Shiv Sena's fire brand leader Sushma Andhare life threat? Sushma Andhare told the sequence of events in the press conference, what exactly happened? Know in detail

शिवसेनेच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या फायर ब्रँड नीट या सुषमा अंधारे यांनी केलेले भाषण प्रचंड गाजले. त्यानंतर त्यांच्या भाषणाला राज्यभरातून मागणी होत आहे.एक लोकप्रिय चेहरा म्हणून त्या राज्याच्या राजकारणात ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सध्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्र सुरू आहे. या यात्रेची महत्वाची जबाबदारी सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर आहे.

गुरुवारी वाशीमध्ये शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा पार पडली. त्यानंतर शिवसेनेची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सुषमा अंधारे यांनी धमकी बाबत खुलासा केला.  त्या म्हणाल्या की, कालपासून मला काही धोके जाणवतायेत, काही इनपुट्स आले आहेत, ज्यामध्ये असं समजलं की, बाहेर पडू नका, कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन, काल विद्यापीठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले. विश्रांतवाडी आणि लोहगाव पोलिस स्टेशनचे फोन येत होते आणि तुम्ही सुखरूप आहात ना अशी विचारणा करत होते. मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे. काहीतरी सुरु आहे.

काल माझ्या घराखाली दोन पोलीस येऊन थांबले होते. त्यांनी काळजी घ्या असे सांगत काही वाटले तर आम्हाला सांगा असे सांगितले. याबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे. या बाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे. मला संरक्षण देण्याबाबत पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलेले आहे असेही अंधारे म्हणाल्या आहेत.

“मला शूट करतील का? वेगवेगळ्या प्रकरणात किंवा विविध पद्धतीने. तर मला काय चिंता आहे, माझ्याकडे एक पाच वर्षांचं बाळ आहे. म्हणून मी आज अगदी जाहीरपणे सांगितलं की, मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक देते, जेवढे शिवसैनिक आहेत ते मामा म्हणून त्याला सांभाळतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील.” असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं.