Sanchita Ugale Case : कुम कुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने उचलले टोकाचे पाऊल, संपवली जीवनयात्रा.!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sanchita Ugale Case : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी प्रसिध्द अभिनेत्री संचिता उगले (Sanchita ugale death) हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वसईच्या नालासोपारा परिसरात घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Sanchita Ugale Latest News)

Sanchita Ugale Case, Kumkum Bhagya fame actress Sanchita Ugale takes the extreme step, ends her life,

संचिता उगले हीने साजन घर, कुमकुम भाग्य, वागळे की दुनिया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. कुमकुम भाग्य या मालिकेतील दिया टंडन या भूमिकेमुळे तिला घराघरांत ओळख मिळाली होती. संचिता आपल्या मालिका आणि चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखली जात होती. तिने Vicky Kaushal यांच्या Chhaava या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात ती ताराबाई यांच्या भूमिकेत दिसली होती. अतिशय कष्टाळू अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जायचे. तिने अचानक एक्झिट घेतल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, संचिता उगले हीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संचिताने आत्महत्या का केली ? याचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे.

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. छावा चित्रपट तसेच कुमकुम भाग्य, वागले की दुनिया अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या ३०व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं आहे.

नालासोपारा येथे राहत्या घरात पंख्याला साडी बांधून अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. या घटनेने मनोरंजन क्षेत्रात खळबळ पसरली आहे. अशातच या अभिनेत्रीचा आत्महत्या करण्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला असून ही घटना अनेकांना खोटी वाटत आहे. सोशल मीडियावर संचिताला श्रद्धांजली वाहिली जात असताना संचिताची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संचिता ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील आलिया भट्टच्या गाण्यावर नाचताना आणि गाताना दिसत आहे.

संचिता उगले आत्महत्येच्या काही तास आधीपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होती आणि तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. तिच्या मृत्यूची बातमी पसरताच, तिची शेवटची पोस्ट व्हायरल झाली. आत्महत्या करण्यापूर्वी, संचिताने एक गोड व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. त्यामध्ये, संचिता ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील आलिया भट्टच्या गाण्यावर नाचताना आणि गाताना दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर संचिताने ‘मी नाचते, तू नाच…’ असे कॅप्शन दिले. संचिताचा शेवटचा व्हिडिओ पाहताना तिचे चाहते ‘इतकी आनंदी दिसणारी मुलगी काही तासांतच स्वतःचा जीव कसा घेऊ शकते, यावर विश्वास बसत नाही’, असे म्हणत आहेत. तसेच चाहत्यांकडून दुःख व्यक्त केले जात असताना सतत संचिताने आत्महत्या का केली? असा प्रश्न विचारला जात आहे.

संचिता उगले नालासोपारा पूर्व येथे तिच्या आई-वडील आणि १५ वर्षांच्या बहिणीसोबत राहत होती. आत्महत्या केली तेव्हा संचिता घरी एकटीच होती. संचिताने साडीचा फास बनवून छताच्या पंख्याला लटकून आत्महत्या केली. तथापि, अद्याप कोणतीही आत्महत्या चिठ्ठी सापडलेली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.