जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत ‘कार्यकारणी सदस्यपदी धडाडीचे पत्रकार समीर सय्यद’ हे निवडून आले आहेत. समीर सय्यद हे अतिशय अभ्यासू, शांत, संयमी व धडाडीचे तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणारे मनमिळाऊ पत्रकार म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पुण्यातील अनेक वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम केले आहे. सध्या ते नवभारतमध्ये कार्यरत आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणूकीत संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी ‘दिव्य मराठी’चे मंगेश फल्ले हे निवडून आले आहेत. तर ‘महाराष्ट्र टाईम्स’चे राजा गायकवाड आणि ‘साम टीव्ही’चे सागर आव्हाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे : खजिनदार – दिलीप तायडे (केसरी), चिटणीस तनिष्का डोंगरे (सकाळ), नीलेश चौधरी (पुण्यनगरी), कार्यकारिणी सदस्य- लक्ष्मण खोत (भास्कर), राजाराम पवार (सामना), दत्तात्रय आढाळगे (सामना), अतुल चिंचली (लोकमत), नरेंद्र साठे (सकाळ), आशिष देशमुख (पुढारी), समीर सय्यद (नवभारत), विक्रांत कुलकर्णी (केसरी), तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाईम्स) आणि सज्जाद सय्यद (ई-टीव्ही भारत). मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.