Saif Ali Khan Attack : बाॅलीवुड हादरले ! अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला, घरात घुसून करण्यात आला चाकू हल्ला !
Saif Ali Khan Attack Latest News In Marathi : बाॅलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सैफ अली खानवर (saif ali khan) गुरूवारी पहाटे प्राणघातक हल्ला झाला. सैफ अली खान कुटूंबियासह घरात झोपलेला असताना त्याच्यावर चाकू हल्ला (knife attack) करण्यात आला.या हल्ल्यात सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.जखमी सैफला उपचारासाठी लिलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. (Saif Ali Khan Health News Today)

याबाबत सविस्तर असे की, सैफ अली खान हा आपल्या घरात कुटूंबियासह झोपेत असताना गुरूवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्या बंगल्यात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. सैफला सहा जखमा झाल्या आहेत. यातील दोन जखमा खोलवर आहेत. एका जखमेचा व्रण त्याच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. तसेच त्याच्या मानेलाही १० सेंटीमीटरची जखम झाली आहे. न्यूरोसर्जन डाॅ नितिन डांगे व सौंदर्य शास्त्र तज्ञ डाॅ लीना जैन यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर शस्त्रक्रीया सुरू आहे, अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी यांनी दिली.
Saif Ali Khan Attack : हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांचा वेगाने तपास सुरू
दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. सैफवर कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला याचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांचही या घटनेचा सखोल तपास करत आहे.” मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. सध्या घरातील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुरावे गोळा करून तपास करण्यात येत आहे.