ration card new update 2021 : शिधापत्रिका मिळवणे झाले आता सुकर, राज्य सरकारने केला मोठा बदल

ration card new update 2021  :  शिधापत्रिका मिळवणे झाले आता सुकर, राज्य सरकारने केला मोठा बदल

जाामखे टाईम्स वृृृृत्तसेवा | सत्तार शेख | ration card new update 2021 : सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पुरवठा विभागात अनेक हेलपाटे मारावे लागतात.रेशनकार्ड काढण्यासाठी तहसीलदारांनी जारी केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Certificate of Income) आवश्यक असते.परंतु आता राज्य सरकारने रेशनकार्ड काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. (Getting ration cards is now easy, state government has made big change)

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection) दिनांक 15 सप्टेंबर रोजी नवा शासन आदेश (GR) जारी केला आहे. केंद्र शासनाच्या अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.(ration card new update 2021)

आता शिधापत्रिकेसाठी (Ration card) अर्जदाराचे उत्पन्नाचे हमीपत्र (Guarantee of income) ग्राह्य धरले जाणार आहे, असा शासन निर्णय राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात नेमके काय म्हटले आहे ? चला तर मग जाणून घेऊयात. (ration card new update 2021)

१) Cut off Date बाबतचे संदर्भाधीन दि. १३.१०.२०१६, दि. २१.५.२०१८ (हमीपत्रासह), दि. ६.७.२०१९ चा शासन निर्णय याद्वारे रद्द करण्यात येत आहे.

२) विभक्त शिधापत्रिकांची मागणी करणान्या विद्यमान अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी कुटुंबाची शिधापत्रिका धारण करणाऱ्या तसेच, सद्यस्थितीत शिधापत्रिका धारण करीत असलेल्या परंतु, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट नसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे या शासन निर्णयासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र सक्षम प्राधिकान्याकडे सादर करणे अनिवार्य राहील. (ration card new update 2021)

३) नव्याने शिधापत्रिकेची मागणी करुन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनीदेखील वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे या शासन निर्णयासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य राहील. (ration card new update 2021)

 ४) क्षेत्रीय कार्यालयास अंतिमतः देण्यात आलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत वेळोवेळी उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका धारकांमधून लागू असलेल्या विद्यमान निकषांनुसार त्या शिधापत्रिकाधारकास राष्ट्री अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात यावे. शिधापत्रिका संगणकीकरणाचा तांत्रिक कालावधी विचारात घेऊन तद्नंतर त्या शिधापत्रिकाधारक सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी. (ration card new update 2021)

5)  संदर्भाधीन सर्व शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता दिलेल्या इतर सूचना कायम राहतील

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०९१५१५२४३८५५०६ असा आहे.

अर्जदाराने द्यावयाचे नमुना हमीपत्र खालीलप्रमाणे.

ration card new update 2021
ration card new update 2021

 

web title: ration card new update 2021