Ram Shinde Sabhapati: दिल्ली दौर्‍यावरून परतताच सभापती प्रा.राम शिंदे यांनी केली कामकाजाला सुरुवात, विधानभवनात महत्वाची बैठक घेत अधिकाऱ्यांना दिले महत्वपूर्ण निर्देश !

मुंबई, ९ जानेवारी, २०२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सह भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर दोन दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावरून मुंबईत परतलेल्या विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे (ram shinde mla) यांनी आज विधानभवन येथे (Vidhan Bhavan Mumbai) विधानमंडळ कामकाज आढावा बैठक घेतली आणि आपल्या कामकाजाला सुरुवात केली.या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

Ram Shinde Sabhapati,  As soon as he returned from the Delhi tour, Speaker Prof. Ram Shinde started the work, held an important meeting in Vidhan Bhavan and gave instructions to the officials,

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कामकाज व इतर महत्वपूर्ण विषयासंदर्भात आज विधानभवनात महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीत प्रा शिंदे यांनी विधीमंडळ सचिवालयातील अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सुचना केल्या.

Ram Shinde Sabhapati,  As soon as he returned from the Delhi tour, Speaker Prof. Ram Shinde started the work, held an important meeting in Vidhan Bhavan and gave instructions to the officials,

यावेळी पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सदस्यांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, असे निर्देश यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांनी यावेळी दिले.

Ram Shinde Sabhapati,  As soon as he returned from the Delhi tour, Speaker Prof. Ram Shinde started the work, held an important meeting in Vidhan Bhavan and gave instructions to the officials,

यासोबतच मनोरा आमदार निवासचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासचेदेखील वारसा वास्तूवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे ‘अजिंठा’ इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत आणि सन्माननीय सदस्यांना तातडीने त्याचा लाभ घेता यावा यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सभापती शिंदे यांनी दिल्या.

Ram Shinde Sabhapati,  As soon as he returned from the Delhi tour, Speaker Prof. Ram Shinde started the work, held an important meeting in Vidhan Bhavan and gave instructions to the officials,

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी वर्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Ram Shinde Sabhapati,  As soon as he returned from the Delhi tour, Speaker Prof. Ram Shinde started the work, held an important meeting in Vidhan Bhavan and gave instructions to the officials,