New Municipal Corporation In Pune : अजित पवारांची मोठी घोषणा, पुणे जिल्ह्यात होणार तीन नवीन महानगरपालिका निर्मिती !

New Municipal Corporation in Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. पुणे शहराच्या लगतच्या परिसरात तीन नवीन महानगरपालिकांची निर्मिती (स्थापन) करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी केली आहे.आज सकाळी अजित पवार चाकण दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी नव्या महापालिकेच्या स्थापनेबाबत मोठे विधान केले.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

पुण्याच्या कोणत्या भागात स्थापन होणार नवीन महानगरपालिका ?

  • चाकण
  • हिंजवडी
  • उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी  पुणे जिल्ह्यातील चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येला घेऊन आज प्रत्यक्ष चाकण येथे विविध ठिकाणी पाहणी केली. या पाहणीवेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणं समजून घेतली आणि अधिकाऱ्यांना यावर त्वरित उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

‘कोणाला आवडो अथवा न आवडो’ पुणे परिसरात 3 नवीन महानगरपालिकांची निर्मिती होणारच – अजित पवार

यावेळी बोलताना पवार यांनी मोठी घोषणा केली. चाकण मध्ये नगरपरिषद आहे. परंतू विकासावर मर्यादा येत आहेत. अशाच प्रकारची स्थिती हिंजवडीमधील औद्योगिक क्षेत्रात आहे. म्हणूनच चाकण आणि हिंजवडीला नवीन महापालिका तयार केल्या जाणार आहेत. तसेच या दोन शहरांबरोबरच उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी सुध्दा नवीन महापालिका केली जाणार आहेत.तीनही ठिकाणच्या महापालिका कोणाला आवडो अथवा न आवडो या सर्व महापालिका होणारच असे यावेळी अजित पवारांनी ठणकावून सांगितले.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

वाहतूक कोंडीची समस्येनं स्थानिक त्रस्त

चाकण औद्योगिक क्षेत्र म्हणजेच एमआयडीसी असो किंवा आयटीपार्क असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्येही दिवसोंदिवस नागरी समस्या वाढत चालल्या आहेत. मागील काही काळापासून या ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत असून नागरिकांचा बराच काळ ट्रॅफिक जॅममध्येच जातो अशी स्थानिकांची तक्रार आहे.
स्थानिक समस्यांवरुन अजित पवारांबरोबरच राज्य सरकारवर टीका केली जात असल्याने हा कळीचा मुद्दा झाला आहे. म्हणूनच अजित पवारांकडून मागील काही आठवड्यांमध्ये वारंवार या भागांची पहाणी सुरु आहे. याच पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी आज नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

‘तुम्ही सहनशीलता दाखवली पण आता…’

यावेळी बोलता अजित पवारांनी, “आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली पण आता यातून सुटका करूयात,” असे ते म्हणाले.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

चाकण येथील दौर्‍यानंतर अजित पवार यांनी पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळ येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत चाकण शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी तसंच विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. चाकण शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी योग्य ती पावलं तातडीनं उचलली जातील.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

उन्नत मार्गाची कामं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत (NHAI) करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील एक महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

Elevated Corridor ला वेळ लागणार असल्यानं पर्यायी उपाययोजना म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३ मीटर रुंदीनं डांबरीकरण करून रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आणण्याबाबत चर्चा बैठकीत झाली. यावर तातडीनं रस्त्याच्या कडेला कठीण मुरुम टाकून मजबुतीकरण करावं, असं सूचित केलं.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

चाकण चौक, आळंदी फाटा, कुरुळी फाटा, स्पायसर रोड, गणेश साम्राज्य चौक (स्पाइन रोड) येथील चौक सुधारणेचं काम लवकर पूर्ण करावं. अबिठाण चौक, चाकण येथील विद्युत खांब हटवून चौक सुधारणा करावी. सेवा वाहिन्यांचं काम भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन नियोजनपूर्वक झालं पाहिजे, जेणेकरून पुढे अडचणी निर्माण होणार नाहीत.

New Municipal Corporation in Pune, dcm Ajit Pawar's big announcement, there will be three new municipal Corporation in Pune district, chakan latest news ,

नगर परिषद हद्दीतील रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाल्यांमुळं निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीनं उपाययोजना करावी, याबद्दलही त्यांनी सूचना केल्या.

1) अजित पवार यांनी कोणती मोठी घोषणा केली आहे?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात तीन नवीन महानगरपालिका स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या महानगरपालिका चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी या भागात स्थापन केल्या जाणार आहेत.

2) या महानगरपालिका स्थापन करण्याचे कारण काय आहे?

चाकण आणि हिंजवडी या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सध्या नगरपरिषदांमुळे विकासावर मर्यादा येत आहेत. वाढत्या नागरी समस्यांमुळे, विशेषतः वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महानगरपालिका स्थापन करणे आवश्यक आहे. यामुळे अधिक निधी मिळवता येईल आणि रस्ते, ड्रेनेज यासारख्या सुविधा सुधारता येतील.

3) महानगरपालिका स्थापनेबाबत अजित पवार यांचे नेमके मत काय आहे?

अजित पवार यांनी ठामपणे सांगितले की, चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी येथे महानगरपालिका स्थापन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे विकासासाठी जागतिक बँक आणि केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळवता येईल. त्यांनी म्हटले, “कोणाला आवडो ना आवडो, या महानगरपालिका होणारच.”

4) या घोषणेचे राजकीय परिणाम काय असू शकतात?

ही घोषणा पुणे आणि आसपासच्या भागातील विकासाला चालना देऊ शकते, परंतु स्थानिक पातळीवर काहींचा विरोधही होऊ शकतो. अजित पवार यांनी यापूर्वी हिंजवडीतील समस्यांवरून स्थानिक सरपंचांना खडसावले आहे, त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि प्रशासन यांच्यातील तणाव वाढू शकतो. तसेच, ही घोषणा महायुती सरकारच्या विकासाच्या अजेंड्याला बळ देणारी ठरू शकते.