रविवारी नवाब मलिकांची पत्रकार परिषद, NCB चा फर्जीवाडा बाहेर निघणार ? देशाचे लागले लक्ष

Minister Nawab Malik’s Press Conference On Sunday, Which NCB Scam Will Come Out Tomorrow? The Country’s Attention

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : नव्या वर्षात राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. उद्या 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मलिक हे पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत मलिक यांनी ट्विट केले आहे. (Minister Nawab Malik’s Press Conference)

चर्चेतल्या बातम्या

नवाब मलिक विरूध्द एनसीबीचे समीर वानखेडे हा सामना मागील वर्षी देशभर चर्चेत आला होता. बाॅलीवूड सुपर स्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर देशभर वातावरण तापले होतं. एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर कारवाई केली होती. यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत एनसीबीकडून सुरू असलेल्या फर्जीवाड्याचा पर्दाफाश केला होता.

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात पत्रकार परिषदा घेत आरोपांची राळ उडवून दिली. नवाब मलिक आज काय बोलणार ? कोणता खुलासा करणार? याकडे देशाचे लक्ष लागलेले असायचे. मध्यंतरी कोर्टात काही प्रकरणे गेल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषदा थांबवल्या होत्या. परंतू मलिक या ना त्या माध्यमांतून फर्जीवाड्याविषयी भाष्य करत होते.

मंत्री नवाब मलिक यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याचा इरादा जाहिर केला आहे. 1 जानेवारी रोजी रात्री नवाब मलिक यांनी एक ट्विट करत 2 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, मी उद्या 02 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करीन आणि एनसीबीच्या आणखी चुकीच्या गोष्टी उघड करीन.

नवाब मलिक अल्पसंख्यांक विकास मंत्री, महाराष्ट्र

.https://twitter.com/nawabmalikncp/status/1477313641808465920?t=O0gKxvIoNYJ4kZsMqPUF7Q&s=19