Karjat Jamkhed Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अगामी 30 ते 35 दिवस ठरवणार कर्जत जामखेडच्या भविष्याची दिशा, भूमिपुत्र की पार्सल ?कोण मारणार बाजी ? उत्सुकता शिगेला !
Karjat Jamkhed Vidhan Sabha Nivadnuk 2024 : सत्तार शेख । जामखेड टाइम्स वृत्तसेवा । १८ ऑक्टोबर २०२४ । “राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा या मतदारसंघात भूमिपुत्र उमेदवार विरूध्द पार्सल (बाहेरचा उमेदवार) असा थेट सामना रंगणार आहे. पुढील ३० ते ३५ दिवसांत कर्जत जामखेडच्या ‘भविष्याची’ खरी दिशा ठरणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या आमदार राम शिंदे (ram shinde ) यांची बाजू वरचढ दिसत आहे. (Karjat Jamkhed Assembly constituency)
“आमदार प्रा राम शिंदे यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात करोडोंचा निधी खेचून आणला. त्यातून प्रचंड कामे उभी राहिले. विशेषता: जलयुक्त शिवार योजनेची त्यांनी केलेली प्रभावी अंमलबजावणी दुष्काळी भागाला वरदान देणारी ठरली. अनेक शासकीय इमारती बांधल्या, गाव तिथे रस्ता ही मोहिम प्रभावी राबवली. हळगावला जिल्ह्यातील पहिले शासकीय कृषि महाविद्यालय आणले, कुसडगावला एसआरपीएफ सेंटर व्हावे याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. या सर्व गोष्टी असतानाही त्यांच्याविरोधात केलेल्या चुकीच्या प्रचाराचा त्यांना २०१९ मध्ये मोठा फटका बसला.”
कर्जत-जामखेड मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्याविरोधात मतदारसंघातील सर्व नेते एकवटले होते. या सर्व नेत्यांच्या मदतीने राष्ट्रवादीला हे यश मिळाले. त्यातच रोहित पवार व त्यांच्या पक्षातील नेते आणि यंत्रणेने मागील निवडणुकीत आश्वासनांचा तुफान पाऊस पाडला. जनतेला अनेक प्रलोभने दाखवली. शिंदे यांच्या विरोधात अनेक चुकीचे आरोप केले. याचा मोठा फटका भाजपला बसला. २०१९ ला पवार कुटुंबाने दिलेल्या आश्वासनांना आणि इव्हेंटबाजीला मतदारसंघातील भोळी बापडी जनता भुलली. (karjat jamkhed news)
गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. कर्जत जामखेडच्या जनतेने ज्या अपेक्षेने रोहित पवारांना निवडून दिले होते, त्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात नुसता इव्हेंट आणि जाहिरातींचा महापुर आला. जनतेला हक्काचे पाणी हवे होते, तरूणांना हक्काचा रोजगार हवा होता, पण यातील काहीच झाले नाही. उलट महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्जत तालुक्याला कुकडीचे मुबलक आवर्तन देण्यात रोहित पवार अपयशी ठरले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तुकाई चारी योजनेलाही त्यांना गती देता आली नाही.तर दुसरीकडे जामखेड तालुक्याला हक्काचे पाणी आणण्यात त्यांना पुरते अपयश आले. (karjat jamkhed latest news)
महायुती सरकार बनत असताना प्रा राम शिंदे यांची भाजपने विधानपरिषदेवर वर्णी लावली आणि मतदारसंघाचे चित्रच पालटून गेले. भाजपात पुन्हा नवा उत्साह संचारला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांनी ‘हम करे सो कायदा’ या प्रमाणे मनमानी कारभार केला. विरोधकांना त्रास तर दिलाच शिवाय स्वता:च्या पक्षातील जनाधार असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देत सतत अपमानास्पद वागणूक दिली. कार्यकर्त्यांवर विश्वास न दाखवता परजिल्ह्यातून आयात केलेल्या शेकडो पीएंच्या माध्यमांतून मतदारसंघाचा कारभार हाकला. (rohit pawar karjat jamkhed)
रोहित पवारांनी पाटेगाव खंडाळा भागात एमआयडीसी निर्मितीचा घाट घातला होता. पण ही एमआयडीसी निरव मोदी सारख्या देशाची फसवणूक करणाऱ्याच्या तसेच पुणे मुंबईतील धनदांडग्यांच्या जागेत होत असल्यामुळे महायुती सरकारने ही एमआयडीसीची जागा रद्द केली. पाटेगाव खंडाळा या भागातच एमआयडीसी होणार हा दावा वारंवार रोहित पवारांकडून केला जात होता, यासाठी वेगवेगळे इव्हेंट राबवले. पण त्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला. महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार असताना रोहित पवारांना कर्जत एमआयडीसी मंजुर करता आली नाही, संधी असतानाही त्यांना एमआयडीसी मंजुर करून आणण्यात अपयश आले, हे वास्तव सत्य नाकारून चालणार नाही.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून महायुती सरकारने कर्जत एमआयडीसीसाठी कोंभळी खांडवी भागातील जागा निश्चित केली. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकारने या एमआयडीसीची अंतिम अधिसुचना राजपत्रात प्रसिध्द केली. कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही आदळ आपट न करता, कोणतेही इव्हेंट न करता आमदार राम शिंदे यांनी महायुती सरकारकडून कर्जत एमआयडीसी मंजुर करून आणली. आमदार शिंदे यांनी मागील अडीच वर्षांत कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मतदारसंघात खेचून आणला. यातून अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. (ram shinde karjat jamkhed)
आमदार रोहित पवार यांच्या काळात जामखेड शहर विकास आराखडा बनवला गेला, हा आराखडा शहरातील नागरिक व व्यापार्यावर अन्याय अत्याचार करणारा आहे निघाला. विकास आराखड्याला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, शेकडो नागरिकांनी हरकती नोंदवल्या, आंदोलन केले, जामखेड बंद ठेवले, जनतेची आणि कृती समितीची मागणी लक्षात घेता आमदार राम शिंदे यांच्या मध्यस्थीने महायुती सरकारने विकास आराखडा रद्द केला. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षांत अतिशय मनमानी पध्दतीने कारभार केला. ज्या नेत्यांनी मागच्या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं त्यांना सातत्याने अपमानित केले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही कधीच विश्वासात घेतले नाही. गावपातळीवरच्या राजकारणात प्रचंड हस्तक्षेप केला. यातून त्यांच्याविरोधात मोठी लाट निर्माण झाली. याचा पहिला फटका त्यांना दोन्ही तालुक्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत बसला.
पण यातून त्यांनी कसलाच बोध घेतला नाही. नाराजांची नाराजी दुर करण्यात त्यांना अपयश आले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Karjat Jamkhed Vidhan Sabha Nivadnuk 2024 ) तोंडावर अनेक मोठ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रालाच विधानसभेत पाठवायचे असा जंग मतदारसंघातील नेते कार्यकर्ते व स्वाभिमानी जनतेने बांधला आहे. मतदारसंघात याचीच जोरदार चर्चा आहे. एकूणच घडत असलेल्या या घडामोडींमुळे रोहित पवार यांची नाव संकटात सापडल्याचे स्पष्ट चित्र आहे.
दरम्यान, आमदार प्रा राम शिंदे यांनी जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमांतून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.जनतेशी संवाद साधला, त्यांनी आजवर केलेली विकास कामांची माहिती जनतेला दिली. जनतेचे प्रश्न जाणून घेतले. त्यांच्या या जनसंवाद पदयात्रेस तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आमदार शिंदे यांनी पदयात्रेनंतर एमआयडीसी मंजुर करून आणल्याने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. ‘भूमिपुत्र आपल्या कामाचा आहे’ हीच भावना गावागावातील जनता बोलून दाखवत असल्याचे जनसंवाद पदयात्रेत दिसून आले.
विधानसभा निवडणुकीची (Karjat Jamkhed Vidhan Sabha Nivadnuk 2024 )आचारसंहिता ते प्रत्यक्ष मतदान हा ३० ते ३५ दिवसांचा कालावधी आहे. या काळात मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथी घडतील. परंतू ज्या स्वाभिमानी जनतेने, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘यंदा भूमिपुत्रच आमदार हवा’ ही भूमिका घेतली त्यांना पुढील ३५ दिवस डोळ्यांत तेल घालून प्रचार यंत्रणा राबवावी लागेल. ‘अभी नही तो कभी नही’ या भूमिकेतून भूमिपुत्रांना यंदाची लढाई लढावी लागेल, भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार, मंत्री, असताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली विकास कामे, एमआयडीसीला मिळवलेली मंजुरी, लाडकी बहिण व इतर सरकारी योजना आणि इतर मुद्दे भूमिपुत्रांच्या बाजूने आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत रोहित पवारांच्या यंत्रणेने चुकीच्या पद्धतीने आरोपांची राळ उठवून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी ठरले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांचा प्रत्येक डाव फसताना दिसत आहे. असे असताना देखील पवार विरोधातील सर्वांना जमिनीवर राहून, हवेत न जाता, यंदाची निवडणूक लढवावी लागेल, या सर्वांच्या मेहनतीवर पुढील ३५ दिवसांतच कर्जत-जामखेडच्या भविष्याची खरी दिशा स्पष्ट होणार आहे. यंदा कर्जत जामखेडची जनता भूमिपुत्राला साथ देणार की पार्सलला (बाहेरचा उमेदवार) स्वीकारणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Karjat Jamkhed Vidhan Sabha Nivadnuk 2024 )