Jejuri Accident: वारकऱ्यांवर काळाचा घाला! जेजुरीजवळ भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू, ६ जखमी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारीत (wari 2026) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना (jejuri Accident) घडली आहे. जेजुरी-बेलसर परिसरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळ्यादरम्यान एका भरधाव ट्रकने वारकऱ्यांना (Warkari) चिरडले. या दुर्दैवी अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, ६ ते ७ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून एकाला उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

Jejuri Accident, Tragedy strikes Warkaris, Speeding truck runs over Warkaris near Jejuri, 3 women killed, 6 injured, Ashadhi wari 2026,Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi,

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त ट्रक (नांदेडचा) वारीसाठी शिधा घेऊन जात होता. ट्रक चालकाचे वय ७० वर्षे असून त्याने तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या. औषधामुळे आलेल्या ग्लानीमुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि भरधाव ट्रक थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती समोर आली आहे.

“आम्ही रस्त्याच्या कडेने (साईडने) व्यवस्थित चाललो होतो. अचानक पाठीमागून एक मोठा ट्रक आला आणि त्याने थेट आमच्या अंगावर गाडी घातली. सगळ्यांना धडाधड पाडत गाडी अंगावरून निघून गेली…अशी माहिती जखमींनी दिली”

मृतांची नावे (सर्व रा. सांगली जिल्हा):
नंदा पवार (वय ६०) – रा. कवलापूर, ता. मिरज
माधवी राजाराम सलगरे (वय ५५) – रा. मालगाव, ता. मिरज
राजश्री शंकर भोसले (वय ५५) – रा. कसबे डिग्रज, ता. मिरज

जखमींची नावे:
१. अक्काताई बबन कोळी (रा. शिरगाव, जि. सांगली)
२. शांता शिवप्पा अलकोपर (रा. मिरजवाडी, जि. सांगली)
३. कासाबाई जगन्नाथ गस्ते (रा. आष्टा, जि. सांगली)
४. लक्ष्मी विठ्ठल गंढदे (रा. नांगोळे, जि. सांगली)
起. शैलजा दिनकर जगताप (रा. कवलापूर, जि. सांगली)
६. मंगल विलास पाटील (रा. कवलापूर, जि. सांगली)

या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अपघातातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी ₹५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील.