Jamkhed Times। धक्कादायक : शनिवारी जामखेड तालुक्यात कोरोनाचा धुमाकुळ 50शी पार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून रोज 30 पेक्षा अधिक रूग्ण सापडत आहेत. जामखेड तालुक्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक दिघोळ गावात आहे.मात्र आता कोरोनाने तालुक्यातील इतर गावांकडेही मोर्चा वळवला आहे.शुक्रवार अखेर जामखेड (Jamkhed) तालुक्यात कोरोनाबाधित सक्रीय रूग्णांची संख्या पाऊणे दोनशेच्या आसपास होती.शनिवारी कोरोना कोणते रूप दाखवणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले होते.अश्यातच कोरोनाने शनिवारी जामखेड तालुक्याला सर्वात मोठा दणका दिला आहे.

Jamkhed, Jamkhed Times

जामखेड तालुका आरोग्य विभागाने शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 125 रॅपिड अँटीजेन चाचण्या  केल्या यामध्ये 32 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये दिघोळ 19,  जामखेड शहर 09, बोरला 02, सारोळा 01, सोनेगाव 01 या रूग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर  जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या 141 RTPCR कोरोना तपासणी अहवालामध्ये तब्बल  18 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जामखेड 06, पाडळी 06,  शिऊर 01, पारेवाडी 01, पिंपरखेड 01, लेहनेवाडी 01, जवळा 01 या रूग्णांचा समावेश आहे अशी माहिती (Jamkhed) वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी सायंकाळी दिली.

जामखेड (Jamkhed) तालुक्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकुण 50 जण कोरोनाबाधित आढळून आल्याने तालुका पुरता हादरून गेला आहे. कोरोनाने मागील महिनाभरातील एकाच दिवसातील सर्वोच्च रूग्णसंख्या नोंदवल्याने जामखेडकरांच्या चिंता आता वाढल्या आहेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोर पालन करावे असे अवाहन जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.