IAS Transfer Maharashtra 2025 : महाराष्ट्रात 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती, कोणाची कुठे नियुक्ती ? जाणून घ्या सविस्तर

IAS Transfer Maharashtra 2025 : महाराष्ट्र शासनाने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत एक मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे.महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर अनेकांना पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

IAS Transfer Maharashtra 2025, Transfers of 20 IAS officers july in Maharashtra, Appointment of many senior officers to important posts, who is appointed where? Know the details,

एम.एम.सूर्यवंशी यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर दीपा मुधोळ-मुंडे यांच्यावर समाज कल्याण आयुक्त पुणे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नीलेश गटणे यांची पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. (Maharashtra ias transfers july 2025)

बदल्या व नियुक्त्या खालीलप्रमाणे:

  • एम.एम. सूर्यवंशी – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई → महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई.
  • दीपा मुधोळ-मुंडे – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे → आयुक्त, समाज कल्याण, पुणे.
  • नीलेश गटणे – मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे → व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई
  • ज्ञानेश्वर खिलारी – संचालक, ओबीसी, पुणे → अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे.
  • अनिलकुमार पवार – आयुक्त, वसई-विरार महापालिका → मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमआरएसआरए, ठाणे.
  • सतीशकुमार खडके – संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग → मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे.
  • शभालचंद्र चव्हाण – आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे → संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • सिद्धार्थ शुक्ला – सहाय्यक जिल्हाधिकारी (गोडपिंप्री उपविभाग, चंद्रपूर) आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, धारणी, अमरावती → पूर्ववत पदांवर नियुक्तीचा आदेश सुधारित.
  • विजयसिंह देशमुख – अतिरिक्त आयुक्त-2, संभाजीनगर → व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई.
  • विजय भाकरे – अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, भंडारा → सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर.
  • त्रिगुण कुलकर्णी – अतिरिक्त महासंचालक, MEDA, पुणे → उपमहासंचालक, यशदा, पुणे.
  • गजानन पाटील – सीईओ, जिल्हा परिषद, पुणे → सदर पदावरच कायम नियुक्ती.
  • पंकज देवरे – अध्यक्ष, जात वैधता समिती, लातूर → व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.
  • महेश पाटील – अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे → आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे.
  • मंजिरी मानोलकर – सहआयुक्त (पुनर्वसन), नाशिक → व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे.
  • आशा पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर → सदर पदावर कायम नियुक्ती.
  • राजलक्ष्मी शाह – अतिरिक्त विभागीय आयुक्त (जनरल), कोकण विभाग → व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई.
  • सोनाली मुळे – अध्यक्ष, जात वैधता समिती, अमरावती → संचालक, ओबीसी, बहुजन कल्याण, पुणे.

या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात गती येण्यास मदत होणार आहे. अनेक अधिकाऱ्यांना प्रथमच आयएएस दर्जा मिळाल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी मार्ग काढण्यासाठी हे फेरबदल महत्त्वाचे ठरणार आहेत.