कर्जत शहरात तीन लाखांचा गुटखा जप्त, तिघांविरोधात गुन्हे दाखल,एलसीबीची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात एलसीबीने हाती घेतलेल्या मोहीमेस मोठे यश मिळाले आहे. कर्जत शहरातील भांडेवाडी येथून तीन लाखांचा गुटखा जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई एलसीबीने पार पाडली आहे.याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई २९ रोजी करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणारांचे धाबे दणाणून गेले आहेत.

Gutkha worth three lakhs seized in Karjat city, cases registered against three, LCB takes strong action, karjat jamkhed latest news today,

कर्जत शहरातील भांडेवाडी परिसरामध्ये सचिन सोपान झगडे हा त्याच्या राहत्या घरी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला जवळ बाळगुन त्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला प्राप्त झाली होती, त्यानुसार एलसीबीने २९ रोजी छापेमारी केली.

यावेळी केलेल्या कारवाईत २ लाख ६८ हजार ५६६ रुपये किमतीचा आर.एम.डी. पानमसाला गुटखा, हिरा पान मसाला गुटखा, विमल पानमसाला गुटखा, डायरेक्टर स्पेशल पानमसाला गुटखा, सुगंधी तंबाखु व ३२ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल असा एकुण ३ लाख ५६६ रुपये किमतीचा मुद्देमाल व  सचिन सोपान झगडे वय ४२ रा. भांडेवाडी, ता. कर्जत, स्वप्निल बबन सोनवणे वय २३ वर्षे, रा. लोणी मसदपुर, ता. कर्जत हे दोघे मिळून आले.

सदरचा माल कोणाकडुन आणला याबाबत चौकशी केली असता भाऊसाहेब किसन सकुंडे रा. मदनवाडी, भिगवन, ता. इंदापुर, जि. पुणे याच्याकडुन आणला असल्याचे आरोपींनी सांगितले.

ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन त्यांच्याविरुद्ध पोकॉ भाऊसाहेब राजु काळे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ व २०११ चे कलम २६ (२) (प), २६(२) (पअ), २७ (३) (डी), २७ (३)(ई), ५९ (प) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, ऱ्हदय घोडके, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अरुण मोरे यांचा समावेश होता.