एक फोन प्राॅब्लेम साॅल्व: आणखेरीदेवी मंदिरासाठी सभापती प्रा. राम शिंदेंनी  तात्काळ उपलब्ध करून दिला नवा ट्रान्सफॉर्मर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधी धानोरा येथील आणखेरीदेवी मंदिर परिसरातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाला होता. नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसर अंधारात जाऊन उत्सवात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे बाळासाहेब जायभाय व अतुल शिंदे यांनी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे याकडे लक्ष वेधले. शिंदे यांनी केवळ एका फोनवर नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून दिला. शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे देवी भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

One Phone Problem Solved, sabhapati Ram Shinde immediately provided new transformer for Aankheri Devi Temple, karjat jamkhed latest news today,

राज्यातील लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या आणखेरी देवीचे मंदिर जामखेड तालुक्यात धानोरा येथील विंचरणा नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथील नवरात्रोत्सव तालुक्यात प्रसिद्ध आहे. या काळात हजारो भाविक या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेत असतात. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.

नवरात्रोत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधी मंदिरावरील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली होती.नवरात्र उत्सव सुरु होण्याआधी ट्रान्सफॉर्मर सुरु व्हावा यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते. दरम्यान अतुल शिंदे व बाळासाहेब जायभाय या कार्यकर्त्यांनी सदर बाब विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांना कळवली. केवळ एका फोनवर प्रा राम शिंदे यांनी तत्परता दाखवली आणि आणखेरी देवी मंदिरासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून दिला.

प्रशासन व वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काही तासांतच नवा ट्रान्सफॉर्म बसविण्यात आला.यामुळे नवरात्र उत्सव निर्विघ्न पार पडत असून, ग्रामस्थ आणि आणखेरी देवी मंडळाने प्रा. राम शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.