MLA Ram Shinde : तुमचा रामभाऊ गरिब जरी असला तरी तो दिलदार आहे दिलदार; आपल्या मातीतल्या तुमच्या लाडक्या रामभाऊला साथ द्या – आमदार प्रा. राम शिंदे यांची लाडक्या बहिणींना भावनिक साद !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । मागच्या निवडणुकीत मी जरी पडलो असलो तरी पुन्हा मी आमदार ( Ram Shinde News) झालो. माझं वर वजन हाय, यंदाच्या निवडणुकीत माझं वजन आणखीन वाढवा. मला मागच्या दाराने नको तर पुढच्या दाराने एन्ट्री द्या, तुमचा हा लाडका भाऊ गरिब जरी असला, तरी तो दिलदार आहे दिलदार, म्हणूनच तुमच्या लाडक्या रामभाऊला साथ द्या, अशी भावनिक साद आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी लाडक्या बहिणींना घातली.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल खर्डा परिसरातील लाडक्या बहिणींच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. हजारो लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) हे बोलत होते.
राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महायुती सरकारने सुरु केली आहे. मात्र सावत्र भाऊ कोर्टात जातोय, बजेटला पैसे नाहीत म्हणतोय, योजना बंद होईल म्हणतोय, पण इकडे चोरून चोरून फार्म भरतोय, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो ही योजना बंद होणार नाही, उलट आपलं सरकार सत्तेवर येताच पंधराशेची ही योजना तीन हजारावर घेऊन जाणार आहोत, सावत्र भावाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे म्हणाले. (Ram Shinde news)
यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरु केलेली आहे. त्याचबरोबर ६५ वर्षांच्या पुढील माणसांनाही तिर्थदर्शन मोफत करण्यात आले आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या योजनांचा लाभ घ्यावा. कोणाच्या फुकटच्या गाडीत कुठं देव दर्शनाला जाऊ नका, देव पावत नाही, म्हणून सांगतोय, असे म्हणत आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.(MLA Ram Shinde)
पुर्वी शेतातली डिपी जर जळाली तर बील भरल्याशिवाय महाविकास आघाडीवाले डीपी देत नव्हते, पण आपलं महायुतीचं सरकार आल्यावर डीपी जळाली की लगेच बसवतात.शिवाय बील पण माफय, गणेशोत्सवनिमित्त सर्व जनतेला आनंदाचा शिधा सरकार देणार आहे.खर्डा परिसरात जलसंधारणाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. अमृतलिंग प्रकल्प केला. ज्या भागातील लोक ऊस तोडायला जायचं तेच आता ऊस बागायतदार झालेत, असे म्हणत शिंदे यांनी खर्डा भागात केलेल्या विविध विकास कामांची यादीच यावेळी वाचून दाखवली.(MLA Ram Shinde)
तुमचं लाडकं सरकार नाही आल्यावर मग पगार कसा चालू राहिल ? तुम्ही फक्त एकदाच लाडकं म्हणायचयं मग पाच वर्षे पगार सुरु राहणारयं, आता जर लाडकं सरकार आणि लाडका भूमिपुत्र आमदार झालाच नाही तर कसं होईल? काही जण म्हणतेत मी आपलाय, लाडकाय, पण तो आपला कसा होईल ? आपला तो आपलाच असतो, असे म्हणत आपल्या मातीतल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे अवाहन यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले. (MLA Ram Shinde)
माझ्या छोट्या लाडक्या बहिणी म्हणायेत की, दादा दादा मला जर १८ वर्षांची झाल्यावर जर मतदानाचा हक्क येतोय तर २१ वर्षे झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कशी होते? त्यामुळे लाडकी बहिण ही योजना १८ वर्षांपासून चालू झाली पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे.असे यावेळी शिंदे म्हणाले.(MLA Ram Shinde)
कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही, याची मी काळजी घेतली आहे. अत्तापर्यंत ९७ हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून पैसे पोहचले नाहीत त्यांच्या खात्यावर या महिन्यात साडेचार हजार रूपये जमा होणार आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही,असा शब्द यावेळी शिंदे यांनी दिला.(MLA Ram Shinde)
आपल्या मातीतल्या हक्काच्या माणसाला आशिर्वाद द्या – MLA Ram Shinde
सरकार यायच्या आगोदरचं सावत्रभाऊ म्हणतोय योजना बंद होणारय मग सरकार आल्यावर तो म्हणीन हे आमचं नव्हतचं, मग कसं वाटल तुम्हाला ? वाईट वाटल का नाही, त्यामुळे आता आपलं सरकार पुन्हा आणायची जबाबदारी लाडक्या बहिणींची आहे. सरकार आणा आणि पुन्हा निश्चिंत रहावा, सर्वांनी भविष्याचा विचार करून आपल्या मातीतल्या हक्काच्या माणसाला आशिर्वाद देण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी केली.(MLA Ram Shinde)
यावेळी युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे,भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संजीवनीताई पाटील,दिपाली गर्जे, उर्मिला मुरुमकर,अर्चना राळेभात,रिंकूताई काशीद, ज्योतीताई गोलेकर,चंद्रकला जायभाय, मुक्ताताई गोपाळघरे, राजश्री कोरे, ज्योती कांबळे, शितल कांबळे, शोभा गोपाळघरे, मंगल गोपाळघरे, सुमिरा आतार, सवेरा आतार, ज्योती खोत, सारिका सुरवसे, तसबीर मोमीन सह आदी महिला पदाधिकारी तसेच हजारो लाडक्या बहिणी यावेळी उपस्थित होत्या. (MLA Ram Shinde)