davos summit 2024 : दावोस जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात 70 हजार कोटींची गुंतवणूक ; तीन प्रकल्पांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी !

Davos summit 2024 : महाराष्ट्रात मोठे प्रकल्प यावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कंबर कसली आहे. दावोस येथे पार पडत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या (Davos World Economic Conference) पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी पहिली मोठी गुड न्यूज समोर आली आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या तीन प्रकल्पांचे सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमांतून सुमारे 70 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात (maharashtra) होणार आहे.

davos summit 2024, good news for Maharashtra from Davos, investment of 70 thousand crores in Maharashtra on Davos World Economic Conference first day, Eknath Shinde davos news,

दावोस येथे आज राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या अद्ययावत दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. (davos summit 2024)

davos summit 2024, good news for Maharashtra from Davos, investment of 70 thousand crores in Maharashtra on Davos World Economic Conference first day, Eknath Shinde davos news,

देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बी.सी.जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटी, ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटी, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी ‘महाप्रित’ आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स यांच्यात ४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला.

davos summit 2024, good news for Maharashtra from Davos, investment of 70 thousand crores in Maharashtra on Davos World Economic Conference first day, Eknath Shinde davos news,

davos summit 2024 : ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार

ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जैन यांची चर्चा झाली.

davos summit 2024 : जिंदाल यांच्यासमवेत 41 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या

देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बीसी जिंदाल यांच्याशी 41 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे 5000 नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील

davos summit 2024 : आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स 4000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रकल्प सुरू होईल. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या दालनात या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता आणि सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

davos summit 2024 : दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे (महाराष्ट्र पॅव्हेलियन) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचेसह उद्योग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 54 व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस इथे यावर्षी मी पुन्हा आलो आहे, गेल्या वर्षी याच ठिकाणी विविध उद्योग-कंपन्यांबरोबर केलेल्या करारांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन राज्याच्या गतीला चालना दिली आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनविणे आणि ते टिकवून ठेवणे याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. यावर्षी उत्पादन, अन्न प्रक्रिया, डिजिटल- नैसर्गिक संसाधने यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी गुंतवणूक येईल, यावर विशेष भर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वच घटकांना फायदा होईल, यावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.