Davos Maharashtra 2025 : दावोसमध्ये 29 कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारने मिळवली 6 लाख 25 हजार 457 कोटींची गुंतवणूक, कोणत्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार? वाचा संपूर्ण यादी

Davos Maharashtra 2025 : महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांत अधिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnavis Davos) यांनी कंबर कसली आहे.जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात निमंत्रित केले जात आहे. दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (worlde conomic foram davos 2025) महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी गुंतवणूक मिळवण्याचा मोठा विक्रम केला. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने 6 लाख 25 हजार 457 कोटी रूपयांचे गुंतवणूक करार (MoU) करण्यात यश मिळवले. यामध्ये 3 लाख कोटींचा सर्वात मोठा करार JSW ने केला आहे. त्याचबरोबर टाटा समूह (TATA) राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. (davos Investment in maharashtra list 2025)

Davos Maharashtra 2025, In Davos, Maharashtra government got investment of 6 lakh 25 thousand 457 crore from 29 companies, JSW will invest 3 lakh crore and Tata group will invest 30 thousand crore in Maharashtra, which companies will invest in Maharashtra? Read the full list

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या पहिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. (Maharashtra mou davos 2025)

काल दिवसभरात 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक परिषदेतून महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक येणार असल्याने अनेक मोठे प्रकल्प आणि त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. दावोसमध्ये घडत असलेल्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (davos Investment in maharashtra list 2025)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये घेतली या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.

रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

जेएसडब्ल्यू महाराष्ट्रात करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक

दरम्यान या भेटी होण्याआधी महाराष्ट्र सरकारने जेएसडब्ल्यू सोबत 3 लाख कोटींचा गुंतवणूक करार केला. जेएसडब्ल्यू नागपुर आणि गडचिरोलीत स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.

दावोसमध्ये पहिला करार गडचिरोली जिल्ह्यासाठी झाला. कल्याणी समूह गडचिरोलीत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रात 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये पहिल्या दिवशी  कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून अश्या २९  कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केले. लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

davos Investment in maharashtra list 2025 : दावोस इन्व्हेस्टमेंट इन महाराष्ट्र लिस्ट 2025

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : 17,500 कोटी
रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : 3500 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 8000 कोटी
रोजगार : 2000

19) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : 1700 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : 8500 कोटी
रोजगार : 17,300

21) सिडको आणि वेलस्पन वर्ल्ड.
एकूण गुंतवणूक: 8,500 कोटी
रोजगार: 17,300
क्षेत्र: लॉजिस्टिक

22) टाटा समूह
एकूण गुंतवणूक : 30000 कोटी
क्षेत्र: एकाधिक

23) CEAT
एकूण गुंतवणूक: 500 कोटी
रोजगार: 500
क्षेत्र : ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही

24) Rural Enhancers
एकूण गुंतवणूक: 10000 कोटी
रूग्णालयांसारख्या सामाजिक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 10000 कोटी सार्वभौम निधी वापरला जाईल.

25) Powerin Urjaa
एकूण गुंतवणूक: 15299 कोटी
रोजगार: 4000
क्षेत्र: हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी)

26)