जामखेड: भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संगम – सागर भाऊ टकले यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राबवला अनोखा उपक्रम!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे खंदे शिलेदार तथा भाजपा युवा मोर्चाचे जामखेड शहर उपाध्यक्ष पै. सागर भाऊ टकले यांनी भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकी — या तिन्ही मूल्यांना एकत्र आणणारा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम कार्तिकी एकादशी निमित्त राबवला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी प्रभाग ११ मधील नागरिकांसाठी पंढरीच्या वारीचे आयोजन केले होते.

confluence of devotion, unity and social commitment - Sagar Bhau Takle implemented unique initiative on occasion of Kartiki Ekadashi, made citizens of Ward Eleven have darshan of Pandurang, spontaneous participation of citizens, jamkhed news today,

कार्तिकी एकादशी निमित्त सागर भाऊ टकले यांनी आयोजित केलेल्या पंढरीच्या वारीत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. चार ट्रॅव्हल्स तसेच काही खाजगी वाहनांच्या ताफ्यातून नागरिकांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या जयघोषात पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान केले. संपूर्ण प्रवास भक्तिमय वातावरणात पार पडला. पंढरीत पोहोचल्यावर सर्वांनी पांडुरंग आणि रुख्मिणी मातेचे दर्शन घेतले. पंढरीच्या वारीचे आयोजन करून पांडुरंगाचे दर्शन घडवून आणल्याबद्दल नागरिकांनी सागर भाऊ टकले यांचे आभार मानले.

सागर भाऊ टकले यांनी प्रभाग ११ मध्ये आजवर अनेक सामाजिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त झालेला हा उपक्रम त्यांच्या या सेवाभावी वाटचालीचा आणखी एक मोलाचा टप्पा ठरला आहे.या वारीतून फक्त भक्तीच नव्हे, तर प्रभागातील नागरिकांमधील एकता, परस्पर विश्वास आणि बंधुभाव अधिक दृढ झाला.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सागर भाऊ टकले हे प्रभाग ११ मधील भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या लोकाभिमुख कामांमुळे आज प्रभागातील जनतेत त्यांच्या नावाबद्दल अपार विश्वास निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला आणि युवक या सर्व घटकांपर्यंत पोहोचून त्यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात ‘सागरमय वातावरण’ निर्माण झाले आहे आणि भाजपकडून त्यांच्या उमेदवारीच्या दावेदारीला दिवसेंदिवस बळ मिळत आहे.

सागर भाऊ टकले यांच्या संकल्पनेतून राबवला गेलेला पंढरीची वारी हा भक्तीमय प्रवास केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर तो जनतेच्या भावनांना जोडणारा, समाजाला एकत्र आणणारा आणि विकासाची दिशा दाखवणारा उपक्रम होता. भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकी” या तत्त्वांना मूर्त रूप देत सागर भाऊंनी प्रभागातील नागरिकांना एकत्र आणत त्यांच्या हृदयात आपले स्थान पक्के केले आहे.

जनसंपर्क मोहिमा, लोकाभिमुख उपक्रम आणि प्रामाणिक वर्तनामुळे सागर भाऊ हे जनतेच्या मनातील विश्वासू चेहरा म्हणून उभे राहिले आहेत. गोरगरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत, तरुणांपासून महिलांपर्यंत – सर्व घटकांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे. सागर भाऊंसारख्या तळागाळात काम करणाऱ्या उमेदवारामुळे भाजपला प्रभाग ११ मध्ये मजबूत पाय रोवण्याची मोठी संधी मिळणार आहे. याच कारणामुळे भाजपकडून सागर भाऊ टकले यांची उमेदवारी अधिक प्रबळ ठरू लागली आहे.