Breaking News : पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक का झाला ? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या तपासणी अहवालातून धक्कादायक माहिती समोर
gulen bury syndrome in marathi : गेल्या चार पाच दिवसांपासून गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने पुणेकरांची झोप उडवून दिली आहे.जीबीएस आजाराच्या रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे.पुण्यात या आजाराचे ७३ रूग्ण उपचार घेत आहेत.पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक का झाला ? कोणत्या कारणातून पुण्यातील नागरिकांना जीबीएस आजार झाला ? याचा शोध घेण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला यश आले आहे. (gbs outbreak in pune)

पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक झाल्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झाले आहे. दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरतात. पुण्यातील रुग्णांना बाधा यामुळेच झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे काही रुग्णांचे शौच व रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संस्थेने या रुग्णांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला पाठविला आहे. त्यात काही रुग्णांना कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हीची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाबही आहेत.
जीवाणू अथवा विषाणू संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना १ ते ३ आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो. हा चेतासंस्थेशी निगडित विकार असून त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो.
कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग कशामुळे होतो?
कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. दरवर्षी जगभरात १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. त्यात ५ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक दिसून येते. या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण २ ते ५ दिवसांत बरा होतो. मात्र, काही रुग्णांमध्ये नंतर गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा होते.
नोरोव्हायरसचा संसर्ग कशामुळे होतो?
जीबीएस रुग्णांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. दरवर्षी जगभरात ६८ कोटींहून अधिक जणांना याचा संसर्ग होतो आणि त्यामुळे वर्षाला सुमारे २ लाख जणांचा मृत्यू होतो. हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला तरी तो हवेतूनही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. बाधित रुग्णाने उलटी केल्यास त्यातून हा विषाणू हवेत पसरून इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण १ ते ३ दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो.
पुणे जिल्ह्यातील GBS रुग्णसंख्या ७३ वर
गुलियन बॅरी सिंड्रोमचा धोका पुण्यात वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील रूग्णसंखा ७३ वर गेली आहे. यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून जि बी एस रुग्णांची संख्या शनिवारपर्यंत ७३ वर पोचली आहे. यामध्ये ४७ पुरूष तर २६ महिला रूग्णांचा समावेश आहे. एकुण ७३ रूग्णांपैकी १४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक ४४ आहेत. एकुण रुग्णांमध्ये नऊ वर्षापर्यंत १३ रुग्ण तर ६० ते ६९ वयोगटातील 15 रुग्ण आहेत.
काय आहे गुलेन बॅरी सिंड्रोम आजार?
गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वता:च्या शरिरावर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंच्या काही भागांना नुकसान होतं आणि स्नायू कमकुवत होणं, मुंग्या येणं, संतुलन गमावणं आणि त्यानंतर पक्षाघात येण्याचं कारण ठरू शकतात.
काय काळजी घ्यावी
- पाणी उकळून व गाळून प्यावे.
- उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
- अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
- दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
- संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
- काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
- याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या