ब्रेकिंग न्यूज : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन देसाई यांची आत्महत्या, चित्रपटसृष्टीत उडाली मोठी खळबळ

मुंबई  : लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज चढवून प्रसिद्ध झालेल्या नितीन देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

Breaking news, Famous art director Nitin Desai's suicide, there was big stir in film industry, nitin desai suicide news,

नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या तीन दशकांपासून देसाई यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. १९४२ पासून अ लव स्टोरी या चित्रपटानं त्यांच्या करिअऱची सुरुवात केली होती.

कर्जत मध्ये देसाई यांचा स्टुडिओ होता. तो त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होती. आता त्या स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. केवळ हिंदीच नाहीतर मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले होते.

नितिन देसाई यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. त्यांचे जाणे हे बॉलीवूड, मराठी चित्रपट नाट्य क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. देसाई यांचे अचानक जाणे हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.