मोठी बातमी : महाराष्ट्र जीएसटी विभागाची मोठी कारवाई, ३० कोटी ५२ लाख रूपयांची करचोरी उघडकीस, दोघा व्यावसायिकांना अटक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र जीएसटी विभागाने ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणात दोघांना अटक करण्याची धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना अटक करण्यात आली आहे.

Big news, Maharashtra GST department takes major action, tax evasion worth Rs 30 crore 52 lakh exposed, businessmen Mehul Jain Kamlesh Jain arrested, Deora Exim LLP,

महाराष्ट्र जीएसटी विभागाने ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांनी चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वजावट घेतल्यामुळे शासनाची महसूल हानी झाली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई राज्यकर सहआयुक्त संजय पवार आणि उपायुक्त स्वप्नाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पाटील, शरदचंद्र पोहनकर, भूपेन्द्र वळवी, मनोहर कनकदंडे यांनी केली आहे.