जामखेड टाइम्स वृत्तसेवा | महाराष्ट्र शासनाच्या ‘कडधान्य आत्मनिर्भर कृषी अभियान’ अंतर्गत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा आणि तूर खरेदीसाठी शासकीय हमीभाव केंद्र (MSP Center) सुरू करण्यात आले आहे. यामुळे खुल्या बाजारातील चढ-उतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार असून, त्यांना हक्काचा भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संधीचा जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे अवाहन बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.

महत्त्वाचे हायलाईट्स (Quick Glance)
- हमीभाव दर: हरभरा ५८७५ तर तूर ८००० प्रति क्विंटलने खरेदी होणार.
- नोंदणी: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात नोंदणी प्रक्रिया सुरू.
- आवश्यक कागदपत्रे: चालू वर्षाचा ऑनलाइन पीकपेरा असलेला ७/१२ उतारा, आधारकार्ड आणि बँक पासबुक अनिवार्य.
- वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केंद्र सुरू राहणार.
१. हरभरा आणि तूर : पाहा नेमका किती मिळणार भाव?
खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. शासनाने या हंगामासाठी खालीलप्रमाणे दर निश्चित केले आहेत:
- हरभरा: ₹५,८७५ प्रति क्विंटल.
- तूर: ₹८,००० प्रति क्विंटल.
खुल्या बाजारात सध्या दराची अनिश्चितता असताना, शासनाने जाहीर केलेले हे दर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
२. नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- नोंदणी प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे:
- ७/१२ उतारा: सन २०२५-२६ चा ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला उतारा.
- आधारकार्ड: आधारकार्डची स्पष्ट झेरॉक्स प्रत.
- बँक पासबुक: बँक खात्याचा IFSC कोड असलेला आणि Aadhaar-linked असलेला पासबुकचा फोटो.
३. हमीभाव केंद्राचे नियम आणि अटी
NCCF व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या केंद्रावर काही तांत्रिक निकष लावले जाणार आहेत: माल दर्जा: शासनाने ठरवून दिलेल्या FAQ (Fair Average Quality) दर्जाचाच माल खरेदी केला जाईल. वेळेचे नियोजन: नोंदणी आणि खरेदीची वेळ सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
४. शेतकऱ्यांना नक्की काय फायदा?
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले आणि उपसभापती नंदकुमार गोरे यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी विशेष पाठपुरावा केला आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवणे आणि त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) पैसे मिळवून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
५. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र: एका नजरेत माहिती
| तपशिल | माहिती |
| केंद्राचे नाव | जामखेड बाजार समिती शासकीय हमीभाव खरेदी केंद्र |
| तुर हमीभाव | ८ हजार प्रति क्विंटल |
| हरभरा हमीभाव | ५ हजार ८७५ प्रति क्विंटल |