Barshi | बार्शी ही गुणवत्तेची खाण : चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार
" ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." प्रकाशनाच्या मार्गावर
बार्शी : बार्शी ही सर्वच क्षेत्रातील गुणवत्तेची खाण असून इथल्या मातीत तयार झालेली माणसे विविध क्षेत्रात सातत्याने विश्वविक्रमी कामगिरी बजावत असल्याचे गौरवोद्गार चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांनी (Barshi) येथे काढले.
ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने (Founder President of the Digital Media Editors Press Association Maharashtra) यांच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील,माजी सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख,आ.रणजितसिंह मोहिते (Bharatiya Janata Party (BJP) state president Chandrakant Patil, former minister Subhash Deshmukh, MLA Ranjit Singh Mohite) यांनी सदिच्छा-संवाद भेट दिली.
यावेळी राजा माने (Founder President of the Digital Media Editors Press Association Maharashtra) यांच्या प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या ” ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकात ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्याच चित्रांची आकर्षक भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.(Barshi)
कुबोटा या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ट्रॅक्टर्स ची सर्वाधिक विक्री करून जगात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल (Barshi) मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे (Santoshkaka Thombre, Founder President of Mathrubhumi Pratishthan) यांचा चंद्रकांतदादा व सुभाषबापूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
(Barshi) चित्रकार नितीन केदारे (Painter Nitin Kedare) यांच्या चित्रकौशल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मातृभूमीचे मार्गदर्शक व उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट, मातृभूमीचे संचालक अजित कुंकूलोळ,प्रा.किरण गाडवे, कोरोनावरील “कॉकटेल” या उपचार पद्धतीचा राज्यात पाहिला प्रयोग करणारे डॉ. संजय अंधारे,माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले,रमेशअण्णा पाटील, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव किरण देशमुख, तेजस राऊत, उद्योजक मुकु़द सोमाणी, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी (Barshi) तालुका अध्यक्ष अजय तथा टिंकू पाटील, डॉ.शुभम थळपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अविनाश बोल्ट यांनी आभार प्रदर्शनपर भाषणात आरोग्य सुविधा विषयी अपेक्षा व्यक्त केल्या.सौ.वर्षा झाडबुके-ठोंबरे (Barshi) यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रकांतदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
(Barshi) माने परिवाराच्यावतीने डॉ.संतोष जोगदंड, विनायक माने,आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऑलिंपिकपटू प्रार्थना ठोंबरे,सौ.शिल्पा राऊत,सौ.मंदा माने, अमित इंगोले,अक्षय दीक्षित, अमोल सावंत, मल्लिनाथ गाडवे,कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, डॉ.राहूल सामनगावकर, मुरलीधर चव्हाण, नवनाथनाना कसपटे,प्रा.विलास गुंड, सूर्यकांत वायकर, राजाभाऊ देशमुख, कमलेशभाई मेहता,अरुण पाटील महागावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा नेते शहाजीभाऊ पवार, धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील, मोहन डांगरे, श्रीकांत देशमुख, महावीर कदम,अतुल दीक्षित तसेच औरंगाबादचे नामदेव खराडे हे आवर्जून उपस्थित होते.(Barshi)