जामखेड: अंजली ढेपे यांची ‘दिशा’ समितीच्या सदस्यपदी निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, महारुळी गावच्या माजी सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे यांची जिल्हा विकास समन्वय समितीच्या (दिशा) नामनिर्देशित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. पंकज आशिया यांनी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले आहे.

Anjali Dhepe elected as member of Disha committee, jamkhed news today live,

​अंजली ढेपे यांनी आतापर्यंत विविध पदांच्या माध्यमातून जनसेवेचे काम केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या माजी तालुकाध्यक्ष आणि महारुळी गावच्या सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. सध्या त्या जामखेड तालुका दक्षता समितीच्या अध्यक्ष, महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्ष, तालुका विधी समितीच्या सदस्या आणि जामखेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या याच सामाजिक आणि प्रशासकीय कार्याची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी त्यांची या महत्त्वपूर्ण समितीवर शिफारस केली.

​’दिशा’ (जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती) ही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

​अध्यक्ष: खा. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी मतदारसंघ)
​सह-अध्यक्ष: खा. निलेश लंके (अहिल्यानगर दक्षिण)
​सदस्य सचिव: जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि  जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे, विकासकामांना गती देण्याचे काम ही समिती करते.

​अंजली ढेपे यांच्या निवडीमुळे जामखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर आणि ग्रामीण विकासावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. खासदार निलेश लंके यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आगामी काळात शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास अंजली ढेपे यांनी यावेळी व्यक्त केला.