कृषीमंत्री दादाजी भुसे यांची मोठी घोषणा : चुकीच्या दराने बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात होणार फौजदारी कारवाई 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बियाणे आणि रासायनिक खतांच्या विक्री संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याची आम्ही दखल घेतली आहे असे सांगत बियाणे आणि खतांची चुकीच्या दराने विक्री करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई हाती घेण्याचा इशारा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

पीक कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँका हात आखडता घेत आहेत, मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे. वेळेवर पीक कर्ज दिले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असेही भुसे म्हणाले.

पुढे बोलताना भुसे म्हणाले की, रासायनिक खतांच्या तक्रारी येत आहेत. त्याची मी दखल घेतली आहे. आज त्याचे रिझल्ट दिसतील. ज्यादाच्या भावाने, चुकीच्या दराने विक्री होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. तसे आदेश दिले असल्याची माहिती दादाजी भुसे यांनी एबीपी माझाच्या महाचर्चा कार्यक्रमात बोलताना दिली. 

Agriculture Minister Dadaji Bhuse’s big announcement, criminal action will be taken against those who sell seeds and fertilizers at wrong rates.