जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी गावात काही विघ्नसंतोषी समाजकंटकांनी मस्जिदमधील पवित्र ग्रथांची विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा जामखेड तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला.सदर प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना आज सोपवण्यात आले.
कुराण या पवित्र ग्रंथावर मुस्लिम समाजाची फार मोठी श्रद्धा आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी गावात मुस्लिम समाजाच्या पवित्र ग्रंथाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्य जामखेड येथील मुस्लिम बांधवांनी तहसिलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जामखेड वकील संघाचे तालूकाध्यक्ष ॲड अब्दुल (शमा) कादर शेख, मुस्लिम पंचकमिटीचे अध्यक्ष अजहर काझी, शेरखान पठाण, मौलाना खलील, मौलाना रिजवान शेख, मूफ्ती अजवद शेख, ॲड जैद सय्यद, ॲड आसिफ पटेल, अँड शकील शहा, अँड कादीर, उमर कुरेशी, जमीर सय्यद, वसीम बिल्डर, शाकीर खान, ताहेर पठाण, शामीर सय्यद, इम्रान शेख, जूबेर शेख , शाकीर पठाण, एजाज शेख, सोमू शेख, मूश्ताक शेख आदी उपस्थित होते.