अखेर जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूकीचा बिगुल वाजला ! (Finally, the trumpet of Jamkhed Municipal Council election sounded)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड नगरपरिषदेची निवडणुक कधी जाहिर होणार याकडे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्याच नजरा लागुन होत्या. अखेर जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूकीचा बिगूल आता वाजला आहे. निवडणुक आयोगाने 15 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मार्चच्या महिन्यात निवडणुका होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय गोटात आता जोरदार हलचाली सुरू झाल्या आहेत. (Finally, the trumpet of Jamkhed Municipal Council election sounded)
निवडणुक आयोगाने राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांची तयारी हाती घेतली आहे. 15 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. त्यावर 22 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सुचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. 01 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. तसेच 08 मार्च रोजी मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या जाहिर केल्या जाणार आहेत.