श्रीशैल्यमलिकार्जुन मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार प्रा.राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : श्री शैल्यमलिकार्जुन मंदिराच्या परिसरात पेव्हिंग ब्लाॅक बसवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, तोही विषय लवकरच मार्गी लागेल. त्याचबरोबर मंदिर परिसरात आणखी काही काम करायचे असेल तर तोही प्रस्ताव द्या,मी महादेवाचा भक्त असल्याकारणाने श्री शैल्यमलिकार्जुन मंदिर परिसराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेडमध्ये बोलताना दिला.

Funds for the development of Shree Shailyamlikarjuna temple premises will not be allowed to fall - MLA Ram Shinde

जामखेड शहरातील सुतार गल्ली भागातील पुरातन श्री शैल्यमलिकार्जुन मंदिराच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिखर बांधकामासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वतीने रोख 21 हजार रूपयांची आर्थिक मदत मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

Funds for the development of Shree Shailyamlikarjuna temple premises will not be allowed to fall - MLA Ram Shinde

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रविणशेठ चोरडिया, सरचिटणीस लहू शिंदे, संपत (नाना) राळेभात, नारायण राऊत गुरुजी, सह आदी उपस्थित होते.

Funds for the development of Shree Shailyamlikarjuna temple premises will not be allowed to fall - MLA Ram Shinde

श्री शैल्यमलिकार्जुन मंदिर हे जामखेड शहरातील पुरातन मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर अडगळीत पडलेलं आणि दुर्लक्षित होतं, स्थानिक नागरिक आणि भक्तगणांच्या पुढाकारामुळे मंदिराचा परिसर सुंदर आणि स्वच्छ झालेला दिसतोय, असे म्हणत स्थानिकांचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी कौतुक केले.

Funds for the development of Shree Shailyamlikarjuna temple premises will not be allowed to fall - MLA Ram Shinde

यावेळी रंगनाथ अशोक राजगुरू, दिलीप विठ्ठल राजगुरू, अंकुश बाबासाहेब राजगुरू,गणेश महादेव घोरपडे, दिनकर सुरेश मोहोळकर, नाना लहू पवार, गणेश शिवाजी चिंचकर, कल्याण विष्णू चौधरी, बापू विलास मोहळकर, श्रीकांत सुरेश सिद्धेश्वर, आनंद चंद्रकांत राजगुरू, राम बाबुराव राजगुरू, प्रदीप वसंत लोहार, दीपक भिमराव उबाळे, सागर दिगंबर निमोणकर, भगवान बाबुराव राजगुरू, अर्जुन महारुद्र राजगुरू, दत्ता बाबासाहेब डोरले, सतीश वसंतराव राजगुरू, रोहित विठ्ठल देशमुख, ओंकार कुलकर्णी, उमेश देशमुख, ओंकार अंकुश राजगुरू, किरण सुरेश भुजबळ, मच्छिंद्र गोरख पवार सह आदी स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.