जामखेड : भगव्या वादळाला निळी सलामी, संविधान चौकात भिमसैनिकांनी साजरी केलेली शिवजयंती ठरली लक्षवेधी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड शहर व तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. संविधान चौकात जामखेड तालुक्यातील भिमसैनिकांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.भगव्या वादळाला निळी सलामी देत भिमसैनिकांनी साजरी केलेली शिवजयंती यंदा सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

Blue salute to saffron storm, Shiv Jayanti celebrated by Bhim Sainiks at Constituent Chowk jamkhed became eye-catching, jamkhed shiv Jayanti news,

जामखेड तालुक्यातील भिमसैनिक आणि बौध्द समाजाच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील संविधान चौक परिसरात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधान स्तंभाशेजारी उभारण्यात आलेल्या स्टेजवर लावण्यात आलेल्या डिजीटल फलकावरील मजकूराने शहरवासियांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. भगव्या वादळाला निळी सलामी असा मजकूर त्यावर लिहला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संविधान चौक परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, नगराध्यक्ष निखिल घायतडक, अशोक निमोणकर, जामखेड तालुका मिडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर, किरण रेडे, राजन समिंदर सर, बापूसाहेब गायकवाड, सागर सदाफुले,राजेंद्र सदाफुले, दादासाहेब घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे,अतिश पारवे, रतन सदाफुले, विनोद सोनवणे सर, सचिन सदाफुले, संतोष थोरात, बाळु काकडे, प्रमोद सदाफुले,दिपक घायतडक, शिवाजी ससाणे,देवा मोरे, रमेश आढाव, सुजित धनवे, सोमनाथ आढाव, सह आदी भिमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Blue salute to saffron storm, Shiv Jayanti celebrated by Bhim Sainiks at Constituent Chowk jamkhed became eye-catching, jamkhed shiv Jayanti news,

यावेळीपोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, संजय काशिद, अशोक निमोणकर, बापूसाहेब गायकवाड, सागर सदाफुले,राजन समिंदर,संतोष गव्हाळे,शिवाजी ससाणे सह आदींनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली.

Blue salute to saffron storm, Shiv Jayanti celebrated by Bhim Sainiks at Constituent Chowk jamkhed became eye-catching, jamkhed shiv Jayanti news,

कार्यक्रम यशस्वीसाठी प्रिन्स ग्रुपचे अध्यक्ष सनी सदाफुले, अक्षय घायतडक, मनीष घायतडक, अमोल गव्हाळे, अविनाश सदाफुले,अशोक सदाफुले,अक्षय गायकवाड, मिलिंद भोसले,सुमित काबंळे, अतिश गायकवाड,अजित घायतडक, विशाल निकाळजे,रोहित सदाफुले,तुषार डाडर, विकी आहेर यांनी परिश्रम घेतले.