takeoff rapper : प्रसिध्द अमेरिकन रॅपर टेकऑफची हत्या, जगभरातील चाहते शोकाकुल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । takeoff rapper । प्रसिध्द अमेरिकन रॅपर टेकऑफची गोळ्या झाडून हत्या ( take off murder) करण्याची खळबळजनक घटना होस्टन ( Houston city) शहरातून समोर आली आहे. मिडीया रिपोर्ट नुसार ही घटना मंगळवारी घडली असल्याची माहिती समोर येत आहे.जगभरातील प्रसिद्ध रॅपरमध्ये टेकऑफची गणना होत होती. टेकऑफच्या हत्येमुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (famous American rapper Takeoff Murder case)

famous American rapper Takeoff shot dead in Houston, dice game, Takeoff rapper latest news

डाईस (Dice) हा खेळ खेळत असताना वाद झाला. या वादावेळी गोळी झाडली गेली, ती टेकऑफ ला लागली, या घटनेत टेकऑफ अन दोघांनाही गोळी लागली, यात 28 वर्षीय टेकऑफचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिस वेगाने तपास करत आहेत. अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ( famous American rapper Takeoff shot dead in Houston, dice game, Takeoff rapper)

टेकऑफचा जन्म 1994 साली लॉरेन्सविले, जॉर्जिया येथे झाला. 2008 साली त्याने पोलो क्लब (Polo Club) या सामूहिक नावाने क्वावो आणि ऑफसेट यांच्या सहकार्याने आपल्या रॅपिंग करिअरची सुरुवात केली. मिक्सटेप जुग हा पहिला सीझन त्यांनी रिलीज केला. या ग्रुपचे अधिकृत नाव ‘मिगोस’ (Migos) असं आहे. मिगोसचा तिसरा सदस्य रॅपर टेकऑफच्या मृत्यूनंतर, त्याचे चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियावर शोक करत आहेत.

हत्येपूर्वी टेकऑफने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. नुकताच त्याचा ‘मेसी’ हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सोशल मीडियावर टेकऑफचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 80 लाख फॉलोअर्स आहेत. तसेच टेकऑफ ‘मिगोस’ ग्रुपचा सदस्यदेखील आहे. या ‘मिगोस’ ग्रुपच्या युट्यूब चॅनलचे 12 लाखांहून अधिक सब्स्क्राईबर्स आहेत.