Sultan Hassanal Bolkiah : पंतप्रधान मोदींनी घेतली जगातील सर्वात श्रीमंत राजाची भेट ! सोन्याच्या महागड्या गाड्या, सोन्याचे विमान, भव्य दिव्य सोन्याचा पॅलेस, 600 रोल्स रॉयल, 7000 अलिशान गाड्या, कोण आहेत ब्रुनेईचे सुलतान?
Who is sultan of Brunei ? : ब्रिटनच्या महारानी एलिजाबेथ द्वितीय यांच्यानंतर जगात सर्वाधिक काळ शासन करणारे सम्राट सुलतान हसनल बोल्किया (Sultan Hassanal Bolkiah) यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे.
पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा उद्देश भारत-ब्रुनेई यांच्यातील संबंध बळकट करणे हा हआहे.त्याचबरोबर दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांना 40 वर्ष पूर्ण झाल्याचं खास निमित्त देखील या दौऱ्याला आहे. जगातील सर्वात श्रीमंत सम्राट म्हणून सुलतान हसनल यांना ओळखले जाते. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे. या राजाची जीवनशैली सर्वांनाच अचंबित करणारी आहे. कारण या राजाचा पॅलेस, विमान, अलिशान कार या सोन्याच्या आहेत. चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेऊयात!
1984 मध्ये ब्रुनेई देशालाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर, ओमर अली सैफुद्दीन तिसरे हे ब्रुनेईच्या राजगादीवर बसले. त्यानंतर हसनल बोलकिया ब्रुनेईचे राजा बनले. तेव्हापासून आजपर्यंत देशाची कमान त्यांच्या हातात आहे. या देशात आजही राजेशाही कारभार चालतो. ब्रुनेई या देशाचे राजे सुलतान हाजी हसनल बोलकिया हे आहेत. बोल्किया यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.
हसनल बेल्कियाह त्यांची संपत्ती आणि शानदार जीवनशैलीसाठी जगभर ओळखले जातात. त्यांच्याकडं जगातील सर्वात मोठा खासगी कारचा संग्रह आहे. त्याची अंदाजे किंमत 5 अब्ज डॉलर आहे. ब्रुनेईमधील तेल आणि गँस भांडारातून मिळणाऱ्या 30 अब्ज डॉलर संपत्तीसह ब्रुनेईच्या सुलतानांकडं 7,000 पेक्षा जास्त अलिशान गाड्या आहेत. त्यामध्ये जवळपास 600 रोल्स रॉयल कारचा समावेश आहे. या प्रकारच्या वेगवेगळ्या उपलब्धीसाठी त्यांच्या नावाची अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
800 दशलक्ष डॉलरची एक कार
हसनल बोल्कियाच्या संग्रहातील प्रमुख वाहनांमध्ये अंदाजे 80 दशलक्ष डॉलर किंमतीची बेंटले डोमिनेटर SUV, होरायझन ब्लू पेंटसह पोर्श 911 आणि X88 पॉवर पॅकेज आणि 24-कॅरेट सोन्याचा मुलामा असलेल्या रोल्स-रॉयस सिल्व्हर स्पर II यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंमध्ये खास पद्धतीनं डिझाइन केलेली रोल्स-रॉईस आहे. ही कार सोन्यानं डिझाईन केलेली असून त्याचं छत ओपन आहे. सुलतानने 2007 मध्ये त्याची मुलगी राजकुमारी माजेदेदा हिच्या लग्नासाठी देखील सोन्याचा मुलामा असलेली रोल्स रॉइस खरेदी केली होती.
- ब्रुनेईच्या सुलतानांकडं 700 पेक्षा जास्त कार आहेत.
- ब्रुनेई सुलतानांच्या राजवाड्यात 1700 बेडरुम आहेत.
- हसनल बेल्किया यांच्या राजवाड्यात 257 बाथरुम आहेत.
- सुलतानांचं खासगी प्राणीसंग्रहालय देखील आहे. त्यामध्ये 30 बंगाल टायगर्स राहतात.
सुलतानांचा कार संग्रह त्यांच्या संपत्तीचा एक छोटा भाग आहे. ते ज्या इस्ताना नुरुल इमान पॅलेसमध्ये (Istana Nurul Iman Palace) राहतात त्याची जगातील सर्वात मोठा निवासी महाल अशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. तब्बल 20 लाख स्क्वेअर फूट परिसरातील हा महाल 22 कॅरेट सोन्यानं सजलाय. या महालामध्ये 5 स्विमिंग पूल, 1700 बेडरूम, 257 बाथरूम आणि 110 गॅरेज आहेत. त्यांच्या खासगी प्राणीसंग्रहालयात 30 बंगाल टायगर्ससह वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचा निवास आहे.
1980 पर्यंत सुलतान हसनल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. इंधन साठे आणि नैसर्गिक वायू हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यांच्याकडे 7 हजार आलिशान गाड्या असून यामध्ये 300 फरारी आणि 500 रॉयल रॉस या अति महागड्या वाहनांचा समावेश आहे. बोईंग 747 जातीचे त्यांच्याकडे स्वतःचे विमान आहे. या विमानासाठी त्यांनी 3 हजार कोटींचा खर्च केला आहे. या विमानाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
या देशात अनोखी परंपरा
ब्रुनेई या देशात अनेक वर्षांपासून प्रत्येक घरासमोर आपल्या पत्नीचा फोटो लावण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही जपली जाते. या देशाच्या राजापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण ही परंपरा जपतात. घरातील महिलांचा सन्मान करणे हा यामागचा उद्देश आहे असे बोलले जाते.
1980 च्या दशकात सुलतान हसन अलीनं जगातील सर्वात मोठा राजवाडा बांधला, ज्यामध्ये सध्याचा ब्रुनेईचा सुल्तान राहतो. या पॅलेसमध्ये 1,770 खोल्या आणि हॉल आहेत. जगातील सर्वात मोठं लक्झरी कार गॅरेज देखील या पॅलेसमध्ये आहे. हा राजवाडा इतका आलिशान आहे की, इथे चक्क सोन्याच्या भिंती आहेत. हा महाल 2 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये मोठ्या दिमाखात उभा आहे. या राजवाड्याचा घुमट 22 कॅरेट सोन्यानं सजवण्यात आला आहे. या राजवाड्याची किंमत 2550 कोटींहून अधिक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रुनेईच्या सुल्तानचं सोन्यावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या महालाच्या भिंती सोन्याच्या आहेत. एवढंच काय तर महालाच्या आवारात ज्या झाडांच्या कुंड्या आहेत, त्यादेखील सोन्याच्या आहेत. सुल्तानच्या गाड्या, विमान, हेलिकॉप्टर सगळं सगळं सोन्यानं मढवलेलं आहे. सुल्तानचं खाजगी विमानदेखील सोन्यानं मढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुल्तानाच्या विमानाला प्लाईंग पॅलेसदेखील म्हटलं जातं. एवढंच काय तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुल्तानानं आपल्या मुलीला भेट म्हणून Airbus A340 दिलं होतं. यावरुन तुम्ही सुल्तानाच्या आलिशान थाटाचा अंदाज नक्कीच बांधू शकता.