Mobile phone चोरी अथवा गहाळ झालाय ? मग ही बातमी आहे तुमच्या खास फायद्याची !

केंद्र सरकारने लागु केली देशात नविन सुरक्षा प्रणाली

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, १८ जुलै : सध्या प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा मोबाईल फोन (Mobile phone) अविभाज्य भाग बनला आहे. गावखेड्यापासुन ते मोठ्या शहरात मोबाईल धारकांची संख्या आता करोडात झाली आहे.

मोबाईल गहाळ होणे अथवा चोरी होण्याच्याही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अश्या घटनांमध्ये मोबाईल परत मिळवणे तसे जिकरीचे ठरत आले आहे. यामुळे मोबाईल चोरांचे चांगलेच फावत आलेले आहे. परंतु आता मोबाईल चोरी अथवा तो गहाळ झाल्यावर चिंता करायची गरज नाही. कारण केंद्र सरकारने नवी सुरक्षा प्रणाली आणली आहे, ज्याद्वारे तुम्हाला हरवलेला तुमचा फोन पुन्हा सहजपणे मिळवता येईल.(Mobile phone)

तत्पूर्वी लॉकडाउनच्या काळात तर स्मार्टफोन वापरात मोठी वाढ झाली आहे.स्मार्टफोनमध्ये केवळ गाणी, व्हिडीओ, फोटो, कॉन्टॅक्ट नंबर्सच नाही, तर अनेक बँक अकाउंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स, विविध पासवर्ड अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात. त्यामुळे स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर युजरसमोर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवला किंवा चोरी झाल्यानंतर तो परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत अनेकांनी माहिती नसते. आता ही समस्या सुटणार आहे.(Mobile phone)

माजी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एक वेब पोर्टल लाँच केलं होतं. या वेब पोर्टलद्वारे तुम्ही चोरी झालेल्या फोनची तक्रार करू शकतात. हा प्रोजेक्ट सुरुवातीला केवळ महाराष्ट्रासाठी करण्यात आला होता. परंतु आता याला संपूर्ण देशभरात लागू केलं जाणार आहे. (Mobile phone)

टेलिकॉम डिपार्टमेंटने २०१७ जुलैमध्ये C-DoT ला मोबाईल ट्रॅकिंग प्रोजेक्ट, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अर्थात CEIR कडे सोपवलं होतं. CEIR हे IMEI नंबर्सचा डेटाबेस आहे. CEIR चा उद्देश मोबाईल चोरीवर रोख लावणं हा होता. CEIR सिस्टम तुमचा फोन चोरी झाल्यानंतर, तुमच्या फोनमध्ये असलेल्या सर्व सेवा ब्लॉक करतो. जर चोराने तुमच्या फोनमध्ये नवं सिम वापरलं, तर ते काम करणार नाही. IMEI नंबर बदलला तरी त्याला कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे मोबाईल धारकांनो आता जास्त चिंता करू नका कारण तुमचा हरवलेला अथवा गहाळ झालेला मोबाईल पुन्हा परत मिळण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे.

Mobile phone हरवला अथवा गहाळ झाल्यास खालील गोष्ट करा

Mobile phone हरवल्यानंतर एक FIR दाखल करावी लागेल.

FIR दाखल केल्यानंतर हेल्पलाईन नंबर १४४२२ द्वारे टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये याबाबत सूचना द्यावी लागेल.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, टेलिकॉम डिपार्टमेंट तुमच्या Mobile phone चा IMEI नंबर ब्लॉक करेल.

यानंतर कोणीही तुमच्या फोनवर कोणत्याही मोबाईल नेटवर्कचा वापर करू शकणार नाही.

जर कोणी नेटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास, IMEI नंबरच्या मदतीने तुमचा सेल्युलर ऑपरेटर त्या फोनला नेटवर्कचा वापर करण्यापासून रोखेल.