iPhone 16 pro : iPhone 16 लाँच होताच iPhone 14 व iPhone 15 इतक्या रूपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या iPhone 16 या सिरीजमधील फोनचे धमाकेदार फिचर्स !
Apple iPhone 16 series : जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी ॲपलने (Apple) बाजारात नवी आयफोन 16 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये iPhone 16, iPhone 16 plus, iPhone 16 pro, iPhone 16 pro max असे चार नवे फोन बाजारात आणले आहेत. या चारही फोन्समध्ये धमाकेदार फिचर्स आहेत. आयफोनने नवी सिरीज लाँच करताच iPhone 14 व iPhone 15 सिरीजच्या फोनच्या किमतीत मोठी सुट दिली आहे.
आयफोन16 सिरीज कधी लाॅच होणार, या नव्या सिरीजच्या फोन्समध्ये नवीन काय काय फिचर्स असणार याची जगभरातील आयफोनप्रेमींना उत्सुकता होती. अखेर ॲपलने आयफोन 16 सिरीज लाँच केली आहे. येत्या 13 सप्टेंबर पासून प्री ऑर्डर बुकिंग सुरु होणार आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर पासून आयफोन वितरणास सुरुवात होणार आहे.
9 सप्टेंबर रोजी अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियास्थित अॅपल पार्कमध्ये कंपनीच्या वार्षिक इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं.यावर्षीच्या इव्हेंटला ‘इट्स ग्लोटाइम’ हे नाव देण्यात आलं. या इव्टेंटनंतर अॅपलने त्यांचे नवीन डिव्हाइसेस लाँच केले. यामध्ये अॅपल वॉच सीरिज-10, एअरपॉड्स-4, अॅपल वॉच अल्ट्रा-2, एअरपॉड्स मॅक्सच्या लाँचनंतर आयफोन-16 सीरिजही लाँच करण्यात आली.
आयफोन-16 मध्ये नवीन काय
अॅपल इंटेलिजन्स
अॅपलच्या या इव्हेंटमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर भर देण्यात आला. आयफोनची ही नवीन सीरिज कंपनीच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह येत आहे.
अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी टीम कुक या इव्हेंटमध्ये बोलताना म्हणाले, “आम्ही अॅपल इंटेलिजन्स आणि त्याच्या सर्वोत्तम क्षमतेसह नव्या रूपात आयफोन सादर करत आहोत.” टीम पुढे म्हणाले, “जूनमध्ये आम्ही अॅपल इंटेलिजन्स लाँच केलं होतं. हे नवीन स्मार्ट आणि पर्सनल इंटेलिजंस सिस्टीम अतिशय आधुनिक आणि वेगळं आहे.”
कंपनीचं म्हणणं आहे की, नवीन एआय सपोर्टमुळे टेक्स्ट, फोटो आणि व्हिडीओमध्ये उत्तम सपोर्ट मिळेल. याशिवाय उत्पादकताही वाढेल. तसेच, सीरी (Siri) पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी सिद्ध होईल. मात्र, ॲपल इंटेलिजन्स फीचर काही महिन्यांनंतरच उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी काही देशांमध्ये यांची बीटा आवृत्ती लाँच केली जाईल.
कॅमेरा कंट्रोल – या नव्या फोनमध्ये कॅमरा अॅक्शन कंट्रोलसाठी साइड पॅनलमध्ये एक बटन देण्यात आलं आहे. याचा उपयोग कॅमेऱ्याद्वारो फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी, झूम, एक्सपोजर, डेप्थ, फिल्ड कंट्रोलसारख्या सेटिंग्समध्ये करता येईल. यामुळे आयफोनने व्हिडिओ किंवा फोटो क्लिक करणं आणखी सोपं होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
अॅक्शन बटन – या सीरिजमध्ये अॅक्शन बटनदेखील देण्यात आलं आहे. या बटनद्वारे एकावेळेस विविध सहजपणे स्विच करू शकतील.
उदाहरणार्थ फ्लॅशलाइट, कॅमेरा किंवा त्याचा वापर करून कंट्रोल उघडू शकतात. रिंग किंवा सायलेंट मोड स्विच करता येईल. याशिवाय विविध नवीन पर्यायही उपलब्ध होणार आहेत.
A18 चिप – अॅपल इंटेलिजन्ससाठी खासकरून या नवीन सीरीजमध्ये A-18 चिपचा वापर करण्यात आला आहे. ही मागील आयफोन सीरिजच्या दोन जनरेशनच्या पुढची चीप आहे. आयफोन 15 मध्ये A-16 बायोनिक चीप वापरण्यात आली होती. यामुळे पॉवर एफिशियन्सीसह बॅटरीचे आयुष्य देखील वाढेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.
कॅमेरा – आयफोन-16 मध्ये 48-मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा प्रणाली देण्यात आली आहे. तसेच टेलिफोटो लेन्समध्ये 2x झूम करण्याची क्षमता आहे. तर आयफोन-16 प्रो मध्ये 5x झूमची क्षमता देण्यात आली आहे.
बॅटरी – आयफोन-16 मध्ये 27 तासांची व्हिडिओ प्लेबॅक क्षमता तर आयफोन-16 प्रोमध्ये 33 तासांपर्यंतची व्हिडिओ प्लेबॅक क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
कलर, डिस्प्ले आणि कॅपेसिटी
आयफोन-16 आणि आयफोन-16 प्लस सफेद, काळा, गुलाबी, टील आणि अल्ट्रिरीन अशा पांच रंगात उपलब्ध आहे. तर, आयफोन-16 प्रो आणि प्रो मॅक्स हा ब्लॅक टायटेनियम, व्हाइट टायटेनियम, नॅच्युरल टायटेनियम, डेझर्ट टायटेनियम या चार रंगात उपलब्ध आहे.
याच्या डिस्प्लेबाबत बोलायचं झाल्यास, आयफोन-16 चा आकार 6.1 इंच, आयफोन-16 प्लस 6.7 इंच तर आयफोन-16 प्रो चा आकार 6.3 इंच आणि आयफोन-16 प्रो मॅक्सचा आकार 6.9 इंच आहे.
क्षमतेच्या बाबतीत आयफोन-16, आयफोन-16 प्लसचे तीन प्रकार असून यात 128GB, 256GB आणि 512GB क्षमता उपलब्ध आहे.
तर आयफोन-16 प्रोसाठी 128GB, 256GB, 512GB आणि 1TB असे चार प्रकार उपलब्ध आहेत. आयफोन-16 प्रो मॅक्स 256GB, 512GB आणि 1TB अशा तीन प्रकारांत उपबल्ध आहे.
किंमत आणि उपलब्धता
आयफोनचे हे सर्व मॉडेल 13 सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात आणि 20 सप्टेंबरपासून देशात उपलब्ध होतील. आता याची किंमत जाणून घेऊया. आयफोन-16 ची किंमत 79,900 रुपये तर आयफोन-16 प्लसची किंमत 89,900 रुपये आहे. तसेच, आयफोन-16 प्रो’ची किंमत 1,19,900 रुपये असून आयफोन-16 प्रो मॅक्सची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे.
आयफोनव्यतिरिक्त कोणते नवीन डिव्हाइस लाँच करण्यात आले
आयफोन 16 सीरिजव्यतिरिक्त अॅपल वॉच सिरीज 10 देखील लॉन्च करण्यात आली आहे. इतर कोणत्याही ऍपल वॉचच्या तुलनेत ही अधिक पातळ आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं, कंपनीचं म्हणणं आहे. याचा उपयोग विशेषतः आउटडोर अॅक्टिव्हिटी आणि हेल्थ मॉनिटरिंगसाठी देखील केला जातो. भारतात ही 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल आणि त्याची किंमत 46900 रुपये इतकी आहे.
कंपनीने अॅपल वॉच अल्ट्रा-2 देखील लाँच केलं असून तेदेखील भारतात 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. याशिवाय अॅपलने एअरपॉड्स-4 आणि एअरपॉड्स मॅक्स-2 देखील लॉन्च केले आहेत.
iPhone 16 सिरीजची किंमत काय आहे? :
भारतात iPhone 16 ची (128 जीबी) किंमत 79,900 पासून सुरू होईल. त्यानंतर 256 आणि 512 जीबी स्टोरेजची किंमत यापेक्षा पुढे असेल. आयफोन 16 प्लसची किंमत 89,900 रुपये, तर आयफोन 16 प्रोची किंमत 1,34,990 रुपये आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 1,59,000 रुपये असेल. चारही मॉडेलची ही मुळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढेल.
iPhone 15 सिरीजची किंमत काय आहे?
आयफोन 16 सिरीज लाँच होताच ॲपल कंपनीने जुन्या फोनच्या किमतीत देखील घट केली आहे. कंपनीने आता आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या मॉडेल्सवर ॲपल कंपनीने तब्बल 10,000 रुपयांची कायमस्वरुपी सूट दिली आहे. त्यामुळे आता iPhone 15 हा स्मार्टफोन 69,900 रुपयांना मिळत आहे. या सोबतच बँक डिस्काउन्ट, एक्स्चेंज ऑफर आदी लाभ देखील मिळणार आहे. तर iPhone 15 Plus या स्मार्टफोनसाठी किंमत आता 79,900 रुपये आहे.
iPhone 14 सिरीजची किंमत काय आहे?
कंपनीने आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस या मॉडेलची देखील किंमत कमी केली आहे. ॲपल कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन 2022 साली लाँच करण्यात आले होते. त्यावेळी या दोन्ही मोबाईल्सची किंमत गेल्या वर्षी तब्बल 10,000 रुपयांनी कमी केली होती.
अशातच आता ॲपल कंपनीने पुन्हा एकदा या दोन्ही मॉडेल्सची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. याशिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर आता 4,000 रुपयांचे बँक डिस्काउंट देखील दिले जात आहे. त्यामुळे आता iPhone 14 हा फोन 59,900 रुपयांना मिळत आहे. तर iPhone 14 Plus हा फोन 69,900 रुपयांना मिळत आहे.
आयफोन 15, आयफोन 14 किती रुपयांनी स्वस्त
आयफोन 16 सिरीजच्या लॉन्चिंगनंतर ॲपल कंपीने आपल्या इतर 5 फोनच्या किमतीत घट केली आहे. ॲपल कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर या पाच आयफोनची नवी किंमत दाखवण्यात येत आहे. कंपनीने या आयफोन्सच्या किमती साधारण 10,000 रुपयांनी स्वस्त केल्या आहेत. नव्या iPhone 16 ला कंपनीने 79,900 रुपयांपासून लॉन्च केले आहे. या नव्या सिरीजच्या फोनमध्ये डेडिकेटेड कॅप्चर बटन, नवे प्रोसेसर, ॲपल इन्टेलिजेन्स यासह अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत.
iPhone 15, iPhone 15 Plus
गेल्या वर्षी 12 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च झालेल्या आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या मॉडेल्सवर ॲपल कंपनीने 10,000 रुपयांची कायमस्वरुपी कपात केली आहे. गेल्या वर्षी iPhone 15 या फोनची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये होती. हा फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोअरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. iPhone 15 Plus या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये होती.
iPhone 16 ही नवी सिरीज आल्यानंतर या दोन्ही फोनच्या किमतीत 10,000 रुपयांनी घट करण्यात आली आहे. यासह या फोन्सवर 4,000 रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काऊन्ट दिले जात आहे. आता iPhone 15 हा 69,900 रुपयांना मिळत आहे. सोबतच बँक डिस्काउन्ट, एक्स्चेंज ऑफर आदी लाभ मिळणार आहे. तर iPhone 15 Plus या फोनसाठी आता 79,900 रुपये मोजावे लागतील.
iPhone 14, iPhone 14 Plus
आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे ॲपल कंपनीचे फोन 2022 साली लॉन्च करण्यात आले होते. या दोन्ही मोबाईल्सची किंमत गेल्या वर्षी 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली. ॲपल कंपनीने आता पुन्हा एकदा या दोन्ही मॉडेल्सची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. या दोन्ही फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांचे बँक डिस्काउन्ट दिले जात आहे. iPhone 14 9 सप्टेंबर रोजी 69,900 रुपयांना मिळत होता. आता हा फोन 59,900 रुपयांना मिळतोय. तर iPhone 14 Plus या फोनला तुम्ही 69,900 रुपयांना खरेदी करू शकता. हे दोन्ही फोन 128GB, 256GB आणि 512GB या व्हेरियंटमध्ये मिळतील.
Phone SE 3 (2022)
ॲपलच्या iPhone SE 3 या फोनच्या किमतीतही घट करण्यात आली आहे. 2022 साली हा फोन लॉन्च झाला होता. या फोनला आता 47,600 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हो फोन सुरुवातीला 49,900 रुपयांना मिळायचा. या फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांचे बँक डिस्काउन्ट दिले जात आहे. iPhone SE 3 हा 64GB, 128GB आणि 256GB या तिन्ही स्टोअरेज व्हेरियंटवर उपलब्ध आहे.