- Advertisement -

गनिमी कावा : चक्क युसुफखाँ बनून मंत्र्याने केले स्टिंग ऑपरेशन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बेधडक, रोखठोक आणि अनोखी कार्यपद्धती अशी ओळख असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अनोख्या कार्यशैलीची चर्चा सतत राज्यात होत असते. (Minister Bachchu became bitter Yusuf Khan Pathan) राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय आज अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आला. बच्चू कडू यांनी आज चक्क मुस्लिम वेश परिधान करत अकोले जिल्ह्यात स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी विविध ठिकाणी धाडी टाकत अनेकांची झाडाझडती घेतली. या अनोख्या स्टिंग ऑपरेशनच्या कारवाईमुळे बच्चू कडू पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहेत. (Bachchu Kadu today conducted a sting operation in Akole district wearing a Muslim dress. They raided various places and took many trees. Bachchu Kadu has once again come under the spotlight in the state due to the action of this unique sting operation.)

Minister Bachchu Kadu performed a sting operation in Akola wearing a Muslim dress

अकोला जिल्ह्याच्या कारभाराचा जवळून अनुभव घेण्यासाठी मंत्री बच्चू कडू यांनी कोणताही शासकीय दौरा जाहीर न करता जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज भेटी दिल्या. त्यांनी मुस्लिम वेशांतर करत आपल्या दौर्‍याची सुरुवात महानगरपालिकेपासून सुरुवात केली. ते युसूफखाँ पठाण बनून स्टिंग ऑपरेशन करत होते. (Minister Bachchu Kadu performed a sting operation in Akola wearing a Muslim dress ) महानगरपालिकेत झाडाझडती घेतल्यानंतर अकोल्यातील एका दुकानावरून गुटखा विकत घेतला. त्यानंतर त्यांचा मोर्चा पातूर येथे पोहोचला.तेथे त्यांनी विदर्भ कोंकण बँकेत जाऊन कर्जाबाबत अर्ज भरून घेण्यास सांगितले. तातडीने अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना पैसेही देवू केले. मात्र, बँकेच्या व्यवस्थापकांनी प्रामाणीकपणे रितसर अर्ज करण्यास सांगितले.

पातूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांचा ताफा पोहोचला. तेथे त्यांनी तातडीने राशन कार्ड बनविण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी रितसर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांची त्यांनी पाहणी केली. कृषी सेवा केंद्रावर जाऊन बियाणे वितरणाची व्यवस्था त्यांनी बघितली. त्यानंतर त्यांनी पातूर येथील एका किराणा दुकानात धाड टाकून तेथे गुटखा जप्त केला. पोलिसांना बोलावून रितसर कारवाई करीत स्वतः बसून विक्रेत्यावर गुन्हा दाखल करवून घेतला.