- Advertisement -

Jamkhed | आठ लाखांचे साहित्य चोरीस; अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड (Jamkhed)तालुक्यातील साकत (sakat) येथून सात ते आठ लाख रूपये किमतीच्या जुन्या वापरातील केबल वायरी व इतर साहित्य चोरी जाण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला (Jamkhed police) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जामखेड (Jamkhed) तालुक्यात साकत येथे असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पातील पवनचक्की परिसरातून दि ०७ जुलै ते ०९ जुलै या कालावधीत जुन्या वापरात असलेल्या केबल्स तसेच सीटी मॉड्युल्सची चोरी झाली. यात ०४ लाख १० हजार २५० रूपयांच्या जुन्या केबल्स तर ०३ लाख ९७ हजार ३०० रूपये किमतीचे सीटी मॉड्युल चोरीस गेले आहेत. ही घटना साकत गावातील गट नंबर १०२०/ १ मध्ये घडली आहेत. या घटनेत सुमारे ०८ लाख रूपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याने साकत भागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी भुषण युवराज मांडेवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम ३८०, ४२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत. (Jamkhed)