CM Jal Samvardhan Yojana | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून 69 जलाशयांच्या दुरुस्तीची कामे मंजूर, 11.79 कोटी खर्च होणार – आमदार रोहित पवार
जामखेड टाईम्स वृत्तसेवा। राज्यातील जलसाठ्यांच्या दुरूस्तीसाठी हाती घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 11.19 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून हा निधी मिळाल्याने मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे. (sanctioned repair works of 69 reservoirs from CM Jal Samvardhan Yojana, 11.79 crore will be spent – MLA Rohit Pawar)
कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठ्यांमधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठ्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने कर्जत जामखेड तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघातील अनेक बंधारे नादुरुस्त होते. यातून पाण्याचा मोठा अपव्यय होत होता. उन्हाळ्यात पाणी टंचाईला सातत्याने सामोरे जावे लागायचे. आता बंधारे दुरूस्त झाल्यास पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे.
Trending
- जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले आई-वडिलांचे छत्र, कुमटकर दाम्पत्याचा मोठा निर्णय, न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव केंद्र सुरू !
- लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी मार्चचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट!
- मोठी बातमी : गॅस वितरकांनो सावधान.. अन्यथा कठोर कारवाई – जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा इशारा !
- मोठी बातमी : खर्ड्यासह जिल्ह्यातील १५ महसुल मंडळात १४ मार्चला होणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
- मोठी बातमी: मध्य महाराष्ट्र ते विदर्भ अलर्टवर! १८ ते २० मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा जोर वाढणार; वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा
- मोठी बातमी: रत्नागिरी जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला; हरचेरी परिसरात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये घबराट
- निसर्गाचा ‘डबल अटॅक’! एका बाजूला सूर्य आग ओकतोय, तर दुसऱ्या बाजूला घोंघावतेय ‘गारपिटी’चं अस्मानी संकट, पुढील ४ दिवस धोक्याचे
- कर्जत-जामखेड अफू शेती प्रकरण; NDPS कायदा किती कडक? शेतकऱ्यांनी जाणून घ्यावेत हे ११ महत्त्वाचे मुद्दे
- जामखेड : कांद्याच्या आड अफूचा मळा; बांधखडक शिवारात ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, खर्डा पोलिसांची धडाकेबाज कारवाई !
- जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले आई-वडिलांचे छत्र, कुमटकर दाम्पत्याचा मोठा निर्णय, न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव केंद्र सुरू !
- लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी मार्चचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट!
- मोठी बातमी : गॅस वितरकांनो सावधान.. अन्यथा कठोर कारवाई – जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा इशारा !
- मोठी बातमी : खर्ड्यासह जिल्ह्यातील १५ महसुल मंडळात १४ मार्चला होणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कमी दर्जाचे कामे झाले आहेत ती कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 69 जलसाठ्यांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामासाठी एकूण 11 कोटी 79 लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे पाण्याचा होणारा अपव्यय तर टाळता येईलच, शिवाय पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होईल.
कर्जत व जामखेडच्या जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो. ते यापुढेही करत राहील. तसेच या योजनेसाठी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी मान्यता दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.