सावरगांव राबविण्यात येणार ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम; हळगाव कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांचा उपक्रम !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ७ जानेवारी २०२४ : ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम (RAWE & AIA) अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत सावरगांवमध्ये दाखल झाले आहेत. कृषिदूतांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. उपसरपंच सचिन ढवळे व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी यावेळी कृषिदूतांचे स्वागत केले.

Rural Agricultural Awareness and Agricultural Industrial Work Experience Program to be implemented in Sawargaon, krushidoot activities of Halgaon Agricultural College

हळगाव कृषि महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २४ आठवडे चालणार आहे. या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहेत.कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकांवर आधारित हाउपक्रम राबवला जातो. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन वास्तव्य करतात.

हळगाव कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत प्रथमेश क्षीरसागर, रोहित लोहकरे,आदित्य नरवडे, शुभम पवार,आकाश पिंपळे, गुणवंत साबळे व तुषार सरडे यांची टीम जामखेड तालुक्यातील सावरगांवमध्ये दाखल झाली. या गावात कृषिदूत वास्तव करणार आहेत. या काळात ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांचे जीवनमान, त्यांचा सामाजिक- आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत.

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग, व्यवसाय व इतर हवामान विषयी जास्तीत जास्त माहिती विविध अँप द्वारे कशी संपादित करता येईल याबाबत विद्यार्थी गावात मार्गदर्शन करणार आहेत.कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषिदूत कृषि आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेणार आहेत.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. नजीर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश लांडे व इतर विषय विशेषतज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सदर कार्यक्रमातून महाविद्यालयाचे कृषिदूत प्रथमेश क्षीरसागर, रोहित लोहकरे,आदित्य नरवडे, शुभम पवार,आकाश पिंपळे, गुणवंत साबळे व तुषार सरडे सावरगांव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.