जवळेकरांना आमदार रोहित पवारांचे मोठे गिफ्ट, जलजीवन मिशन योजनेंतर्गत 20 कोटी रूपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेला मिळाली प्रशासकीय मान्यता !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामस्थांना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून मोठे गिफ्ट मिळाले आहे.जलजीवन मिशन योजनेंतर्गत १९.६६ कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.योजनेला मंजुरी मिळाल्याने जवळेकरांनी आनंदोत्सव साजरा केला.

MLA Rohit Pawar's big gift to jawala village, administrative approval for water supply scheme costing Rs 20 crore under Jaljeevan Mission Yojana

जवळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची मोठी अडचण होती. ती सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडे सरपंच प्रशांत शिंदे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू केला होता.

त्यानुसार जल जीवन मिशन योजनेतून जवळा गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. एकूण १९.६६ कोटी रुपयांची ही योजना असून दरडोई ५५ लिटर/ प्रतिदिन पाणी या माध्यमांतून मिळणार आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली पाण्याची गैरसोय  दूर झाली आहे.

कर्जत व जामखेड तालुक्यातील जास्तीत जास्त गावांचा जलजीवन योजनेत समावेश व्हावा यासाठी रोहित पवार हे प्रयत्नशील होते. राज्य स्तरावर त्यांनी वेळोवेळी संबधित मंत्र्यांना व शासकीय अधिकाऱ्यांना भेटून सर्व गावांचा समावेश जलजीवन योजनेत करून घेतला आहे.

जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आलेल्या कर्जत-जामखेड तालुक्यातील १७७ गावांसाठी तब्बल २५५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून ५५ गावांमध्ये प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. नुकतीच जामखेड तालुक्यातील जवळा येथील योजनेला मंजुरी मिळाली आहे. तसेच खर्डासारख्या मोठ्या गावालाही त्यांनी यापूर्वी १७.६ कोटी रुपयांचा निधी तर मिरजगावसाठी २२.८५ कोटी आणि कोंभळीसह १२ गावांसाठी ३२ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे.