Karjat Jamkhed News : कोपर्डीत राजकीय भूकंप, आमदार राम शिंदेनी केलेल्या शाश्वत विकासाने प्रेरित होऊन राष्ट्रवादीच्या युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात मतदारसंघातील गावागावात मोठ्या प्रमाणात बंड होऊ लागले आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील राष्ट्रवादीच्या युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी रोहित पवारांविरोधात बंड पुकारले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन तसेच कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास बळ देण्यासाठी कोपर्डी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या राजकीय भूकंपामुळे रोहित पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे. ऐन निवडणुकीत रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा धनशक्ती (पार्सल) विरूध्द जनशक्ती (भूमिपुत्र) अशी थेट लढत आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे. आमदार शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेने मतदारसंघाचे चित्रच बदलून गेले आहे. आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करण्याचा जोरदार धडाका लावला आहे. ‘दबाव, दडपशाही, गुंडशाही, हिटलरशाही, हुकुमशाही, विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात रोहित पवारांविरोधात बंड सुरू झाले आहे. पाच वर्षे केलेली जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी आणि गंडवागंडवीच्या विरोधात जनतेचा उद्रेक उफाळून आला आहे.’
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांसह तरूण वर्गाने रोहित पवारांविरोधात एल्गार पुकारत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. रोहित पवारांची साथ सोडत या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. सोमवारी मध्यरात्री कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील राष्ट्रवादीच्या युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चोंडी येथे पार पडला.
कोपर्डी गावातील दिनेश बाळू सुद्रिक, कल्याण जिजाबा सुद्रिक, रवींद्र आश्रू सुद्रिक, शिवाजी दशरथ सुद्रिक, गणेश मच्छिंद्र सुद्रिक, मोहन तात्या सुद्रिक, बापू संतू सुद्रिक, नाना चंद्रभान सुद्रिक, अशोक बाळू शिंदे,संतोष महादेव शिंदे, नाना साधु शिंदे, प्रवीण भाऊसाहेब सुद्रिक, ज्ञानदेव नामदेव सुद्रिक,अशोक नवनाथ सुद्रिक, पंडित सुदाम सुद्रिक, हरि भाऊसाहेब सुद्रिक, प्रशांत राजेंद्र सुद्रिक, शेखर टापरे, शुभम दत्तात्रेय सुद्रिक, ओंकार सुद्रिक, तुषार वसंत सुद्रिक, शहाजी तुकाराम सुद्रिक यांनी रोहित पवारांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी सोमवारी मध्यरात्री आमदार प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेऊन भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी सरपंच सतीश महादेव सुद्रिक, सोसायटीचे चेअरमन श्रीकांत मोहन सुद्रिक मनोज मुकिंदा सुद्रिक, ग्रामपंचायत सदस्य गणेश बंकट सुद्रिक, लक्ष्मण महादेव कानडे शेतकरी संघटनेचे शिवाजी भीमराव सुद्रिक, जालिंदर नारायण सुद्रिक, विजय अनिल डोळस ऋषिकेश सुद्रिक, निवृत्ती सुद्रिक, पोपट हरिचंद्र सुद्रिक, अनिल सुद्रिक, बाळासाहेब सुद्रिक, हनुमंत सुद्रिक, बंकट मारुती सुद्रिक, मनोज संजय सुद्रिक, विक्रम सुद्रिक, महेश गणू सुद्रिक, राहुल हरिश्चंद्र सुद्रिक, महेंद्र धनराज सुद्रिक, दिन सुपेकर सह आदी गावातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कोपर्डी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. कोपर्डी गावात झालेल्या या राजकीय भूकंपामुळे रोहित पवार गटाला जोरदार हादरा बसला आहे.
कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांविरोधात मोठी लाट सक्रिय झाली आहे. गावागावातील राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. या सर्व घडामोडी पाहता स्थानिक भूमिपुत्र आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यंदा मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ते व गोरगरीब सर्वसामान्य जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार शिंदेंचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा विजयाचा गुलाल उधळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.