मुंबई : वृत्तसंस्था | गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा सोन्याचा दर (gold prices) १० हजार रुपयांनी कमी आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याने (Gold Rates) प्रति तोळा ५६,१९१ रुपयांचा स्तर गाठला होता.एक वर्षानंतर सोने ४६ हजार रुपयांवर आले आहे.
गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.डॉलर मजबूत झाला आहे. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येत आहे. (Why has gold prices fallen this year compared to last year?)
सोन्याचा दर (gold prices) ५ आठवड्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. एमसीएक्स (MCX) सोन्याचा दर ४६ हजारांवर आहे. सोन्याच्या दरात एक दिवसात ३ टक्क्यांने घसरण झाल्याचे दिसून आले.
अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनात सुधारणा दिसून येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या (Gold Rates) दरावर दबाव वाढला असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात.
गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात (gold price) २० टक्क्यांनी घसरण झाली आहे.सोन्यावर मिळणाऱ्या परताव्याचा विचार केला तर सोन्याने एमसीएक्सवर एक आठवड्यात १ टक्के, एका महिन्यात २ टक्के परतावा मिळवून दिला आहे.
एका वर्षात सोन्याने ११ टक्के परतावा मिळवून दिला आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. यामुळे सोन्याच्या दरात (Gold Rates) घसरण झाली असल्याचे कमोडिटी मार्केटमधील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
