जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे (Ram Shinde) हे दिल्ली दौर्यावर गेले आहेत. त्यांनी आज NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भाजप प्रणित NDA ने उमेदवारी दिली आहे. सभापती प्रा राम शिंदे यांनी आज सी.पी. राधाकृष्णन यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा व शाल देऊन त्यांचा सत्कार केला.उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी बद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी देशाच्या प्रगतीसाठी निश्चित मोलाची ठरेल, असा विश्वास, यावेळी प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केला.