Income Tax Bill 2025 : करदात्यांसाठी मोठी बातमी !  केंद्र सरकारने  ‘इनकम टॅक्स बिल २०२५’ मागे घेतलं – आता येणार नवा कायदा, जाणून घ्या सविस्तर !

नवी दिल्ली | ८ ऑगस्ट २०२५ : income tax bill 2025 : देशातील लाखो करदात्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकसभेत सादर करण्यात आलेलं ‘इनकम टॅक्स बिल २०२५’ (income tax bill withdrawn) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत मागे घेतले. हे बिल १९६१ च्या जुन्या इनकम टॅक्स कायद्याची जागा घेण्यासाठी सादर करण्यात आलं होतं.

Big news for taxpayers, central government has withdrawn the ‘Income Tax Bill 2025’ – now a new law will come, know the details,

११ ऑगस्टला सादर होणार Income Tax Bill 2025 नवा कायदा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इनकम टॅक्स बिल २०२५’ (income tax bill ) मागे घेतलं. आता या कायद्याचा नवीन आणि सुधारित मसुदा ११ ऑगस्ट २०२५ला (सोमवारी) लोकसभेत मांडण्यात येणार आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा (Baijayant Panda) यांच्या अध्यक्षतेखालील सिलेक्ट कमिटीने दिलेल्या शिफारशींचा नव्या बिलामध्ये समावेश केला जाणार आहे.

सरकारच्या मते, एका पेक्षा अधिक बीलांमुळे गोंधळ होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. नवीन बील सर्व बदल समाविष्ट करून सोमवारी सभागृहाच्या विचारार्थ केले जाणार आहे.

काय बदल होणार नव्या Income Tax Bill 2025 मध्ये?

बैजयंत पांडा यांच्या मते, एकदा Income Tax Bill 2025 हा कायदा मंजूर झाला की,भारताची जुनी, गुंतागुंतीची कररचना अधिक सुलभ होणार, सामान्य करदात्यांना आणि लघुउद्योगांना (MSMEs) मोठा दिलासा मिळणार आहे.
अनावश्यक कायदेशीर गुंतागुंत टाळता येणार.

“१९६१ चा इनकम टॅक्स कायदा आजवर ४,००० पेक्षा अधिक वेळा बदलला गेला आहे आणि त्यात ५ लाखाहून अधिक शब्द आहेत. तो खूप क्लिष्ट झाला आहे. नवीन बिल या संपूर्ण कायद्याला जवळपास ५०% सोपं करणार आहे,” असं पांडा यांनी IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

नवीन कररचनेनुसार सर्व करस्लॅब्स व दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, मध्यमवर्गीयांसाठी कर कमी करून त्यांच्याकडे अधिक पैसा राहील, त्यामुळे घरगुती खर्च, बचत व गुंतवणूक यामध्ये वाढ होईल.

87A अंतर्गत करसूट – आता थेट १२ लाखांपर्यंत!

  • नवीन कर प्रणाली (Sec 115BAC) अंतर्गत
  • कर सवलतीसाठी उत्पन्न मर्यादा वाढवून ₹१२ लाख करण्यात आली आहे (पूर्वी ₹७ लाख होती).
  • कमाल करसवलत ₹२५,००० वरून थेट ₹६०,००० केली आहे.

या व्यतिरिक्त, १२ लाखांच्या थोड्या वर असलेल्या उत्पन्नासाठी ‘marginal relief’ देखील लागू राहणार आहे, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

सामान्यांसाठी कर भरणं होणार अधिक सोपं

नवीन इनकम टॅक्स बिलामुळे सामान्य नागरिकांसाठी, फ्रीलान्सर्स,छोट्या व्यापाऱ्यांसाठी कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि समजण्यासारखी होणार आहे.

केंद्र सरकारने ६४ वर्षांपूर्वीचा इनकम टॅक्स कायदा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सामान्य करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. ११ ऑगस्टपासून नव्या कायद्यावर संसदेत चर्चा होणार आहे. नवीन कायद्यानुसार तुमचे करयोग्य उत्पन्न आणि सवलतींचा हिशोबही बदलणार आहे! सरकार नव्या बिलात कोणत्या गोष्टींचा समावेश करणार याकडे आत देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.