Maratha Akrosh Morcha । इथून पुढे तारीख नाही तर थेट हल्लाबोल: नरेंद्र पाटील सोलापुरात गरजले (No more dates from here, but direct attack: Narendra Patil needed in Solapur )

सोलापुर (जामखेड टाईम्स वृत्तसेवा) : राज्यात मूक मोर्चे निघाले तेव्हा सरकारने त्यांना परवानगी दिली. पण आता मराठा आक्रोश मोर्चाला (Maratha Akrosh Morcha) विरोध केला जातोय.आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ दिलं जात नाही. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. आमची मागणी समाजाच्या न्याय हक्काची आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या.(Maratha Reservation ) त्यांना नक्षलवादी  होऊ देऊ नका; आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर याद राखा इथून पुढे मराठा समाज आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही तर थेट हल्लाबोल (अटॅक) करेल; तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच असा गर्भित इशारा मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील (narendra patil) यांनी महाविकास आघाडी सरकारला (mahavikas aghadi) दिला आहे.ते सोलापूरमध्ये बोलत होते. (Maratha reservation. No more dates from here, but direct attack: Narendra Patil needed in Solapur Maratha Akrosh Morcha)

The government allowed them to hold silent rallies in the state. But now the Maratha Akrosh Morcha is being opposed. Our Morchas are being obstructed. Our people are not allowed to come to the district. A large police force was deployed. Our demand is for the right to justice of the society. .Give reservation to Maratha community, don’t let them become Naxalites; If you try to suppress our voice, remember that from now on, the Maratha community will not give a date for the agitation, but will directly attack; Narendra Patil, the organizer of Maratha Akrosh Morcha, has given an implicit warning to the Mahavikas Aghadi government to see what the government and the system do. He was speaking in Solapur.

नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालीत आज सोलापुरामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात हजारो मराठा तरूण सहभागी झाले होते.विशाल मोर्चात मोर्चकऱ्यांना संबोधित करताना नरेंद्र पाटील यांनी सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला. या पुढे प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी तारीख देणार नाही. थेट अ‍ॅटॅक करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. हे सरकार भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतं. त्यामुळे काळजी घ्या, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Maratha reservation. No more dates from here, but direct attack: Narendra Patil needed in Solapur)

Maratha reservation, No more dates from here, but direct attack, Narendra Patil,  Solapur,Maratha Akrosh Morcha,

A Maratha Akrosh Morcha was organized in Solapura today under the leadership of Narendra Patil. Thousands of Maratha youth had participated in this morcha. While addressing the morchakars in the massive morcha, Narendra Patil strongly attacked the government. From now on, a protest march will be taken out in every district. No date will be given for that. We will attack directly, he warned the government.This government may get you in trouble in the future. So be careful, give reservation to the Maratha community while saying that. He appealed not to let the Maratha youth become Naxalites. As long as the Maratha community does not get reservation, our agitation will continue. “We will not rest,” he said.

अनेकांची पोलिसांकडून धरपकड

मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी संचारबंदी लागू असल्याचं आणि कोरोनाचं कारणही देण्यात आलं होतं. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली. त्यामुळे नरेंद्र पाटीलही संतप्त झाले होते. जोपर्यंत कार्यकर्त्यांना सोडले जात नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका नरेंद्र पाटलांनी घेतली होती. (Maratha reservation. No more dates from here, but direct attack: Narendra Patil needed in Solapur)