आझादी का अमृत महोत्सव | जामखेड न्यायालयाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन
गांधी जयंती ते बाल दिवस या महिन्यात विविध कायदेविषयक उपक्रम संपन्न होणार : न्यायाधीश रजनीकांत जगताप
जामखेड : संपूर्ण देशभरामध्ये न्यायालय विधी समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन महिना उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये विविध कायद्यांची माहिती समाजाला होणार असून समाजाच्या अडचणी सुटणार आहेत. सामाजिक आर्थिक दुर्बल असलेल्या वंचितांना विधी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे, लोकन्यायालयाचे फायदे समाजाला समजले पाहिजेत, कायदयाची माहिती सर्वांना झाली पाहिजे व समाजाच्या अडचणी सुटल्या पाहिजेत हा उद्देश आहे असे न्यायाधीश रजनीकांत जगताप यावेळी बोलताना म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा समिती, उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका विधी समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर बाल दिवस या कालावधीत प्रत्येक दिवशी जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी कायदेविषयक उपक्रम संपन्न होणार आहेत यातून समाजाला कायद्याची माहिती व्हावी हा मुख्य उद्देश आहे असे मनोगत न्यायाधीश रजनिकांत जगताप यांनी व्यक्त केले.
