Ahmednagar Breaking: राजकीय कार्यकर्त्याच्या हत्याकांडाने अहमदनगर जिल्हा हादरला, अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू | Ahmednagar Ankush Chattar Murder Case

अहमदनगर  :  नगरसेवक स्वप्निल शिंदे (Corporator Swapnil Shinde) यांच्या गँगने राष्ट्रवादीशी संबंधित अंकुश चत्तर (Ankush Chattar) या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला (Life threatening attack) करण्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेत ते गंभीर जखमी (Seriously injured) झाले होते. रविवारी रात्री अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death during treatment) झाल्याची माहिती समोर येत आहे. अंकुश चत्तर यांच्या मृत्यूच्या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Ankush Chattar latest News)

Ahmednagar Breaking, Political Worker's Murder Shakes Ahmednagar District, Ankush Chattar Dies During Treatment, Ahmednagar bjp Corporator Swapnil Shinde News, Swapnil Shinde arrest news,

जून्या वादातून अंकुश चत्तर यांच्यावर नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्या गटाने  प्राणघातक हल्ला केला होता. लोखंडी राॅडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत गंभीर जखमी करण्यात आले होते. 8 ते 10 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला होता. ही थरारक घटना अहमदनगरमधील एकवीरा चौकात (Ekvira Chowk Ahmednagar) घडली होती. जखमी अंकुश चत्तर ( रा पद्मानगर, सावेडी ) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतू  दुर्दैवाने या घटनेत अंकुश चत्तर यांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Ankush Chattar Murder News)

प्राणघातक हल्ल्याच्या घटनेप्रकरणी अंकुश चत्तर यांचे दाजी बाळासाहेब भानुदास सोमवंशी (Balasaheb Bhanudas Somvanshi) यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला (Tophkhana police station Ahmednagar) नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी नगरसेवक स्वप्नील शिंदे सह पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शनिवारी रात्री 10: 15 वाजता अहमदनगर शहरातील एकवीरा चौकात दोन गटांत वाद उफाळून आला होता. यातील आदित्य गणेश औटी या तरूणाने सदर वाद सोडवण्यासाठी अंकुश चत्तर यांना फोन करून बोलावून घेतले होते. अंकुश चत्तर व चंदन ढवण यांनी सदरचा वाद सोडवला. त्यानंतर ते दोघे तेथून जात असताना राज फुलारी या तरूणाने त्यांना रोखले. त्याचवेळी दोन काळ्या रंगाच्या देवास नाव लिहिलेल्या गाड्या तेथे आल्या. या गाड्यांमधून नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे व इतर ७ ते ८ जण उतरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे होते. महेश कुऱ्हे याच्या हातामध्ये बंदुक होती. ते सर्वजण अंकुश चत्तर यांच्याजवळ आले व तू स्वप्निल भाऊंचे नादी लागतोस काय? तुला स्वप्निलभाऊ काय आहे ते दाखवतो असे म्हणत सुरज उर्फ मिक्या कांबळे याने लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी इतरांनी चत्तर यांना मारण्यास सुरुवात केली. नगरसेवक स्वप्निल शिंदे हा याला संपवून टाका रे असे म्हणत चत्तर यांच्यादिशेने धावत आला. ते पाहून चत्तर हे सिटी प्राईट हॉटेलच्या दिशेने पळू लागले. त्यावेळी इतर आरोपी चत्तर यांच्या मागे पळत त्यांना मारत होते. चत्तर यांच्या डोक्यात मार लागल्याने ते रस्त्यावर पडले. त्यावेळी सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, महेश कुऱ्हे हे हातातील रॉडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत होते. तर याला संपवून टाका रे असे अभिजीत बुलाखे सांगत होता. तोही पळत येऊन चत्तर यांच्या डोक्यावर रॉडने घाव घालू लागला. त्याचवेळी स्वप्निल शिंदे तेथे आला व हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका व चला लवकर असे म्हणाला व सर्वजण गाडीत बसून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजु फुलारी (सर्व रा. अहमदनगर) व इतर ७ ते ८ जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी रात्री राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. गंभीर जखमी असलेल्या अंकुश चत्तर यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान अंकुश चत्तर यांची प्राणज्योत मालवली. अंकुश चत्तर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. अंकुश चत्तर आणि नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यात जुना वाद होता. याच वादातून नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि त्यांच्या टोळक्याने चत्तर यांची हत्या केली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि त्यांच्या टोळक्याने एका कार्यकर्त्याची हत्या केल्याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. आता या प्रकरणात खूनाचे कलम आरोपीविरुद्ध लावले जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस वेगाने करत आहेत. पोलिसांनी या घटनेतील मुख्य सुत्रधारासह त्याच्या चार साथीदाराला विदर्भातून अटक करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने खून, मारामारी, दरोडे, विनयभंग, बलात्कार अश्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडप्रवृत्ती व गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने मोठी मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.