कर्जत नगरपंचायत निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान | 60 Percent turnout in Karjat Nagar Panchayat elections till 1.30 pm
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत नगरपंचायतच्या दुसर्या टप्प्यातील 4 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. (60 Percent Turnout In Karjat Nagar Panchayat Elections Till 1.30 Pm)
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा अनेक अर्थाने वादग्रस्त ठरला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने कर्जतचे राजकीय वातावरण चांगलेच स्फोटक बनले होते. परंतू दुसर्या टप्प्यातील प्रचार वादग्रस्त ठरला नाही. पवार व शिंदे यांनी उणीदुणी न काढत प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला.
- जामखेड : गांजा तस्करीचा पर्दाफाश, साडेतीन लाखांचा गांजा जप्त, दोघांना बेड्या, एलसीबी व खर्डा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- ब्रेकिंग न्यूज : गावठी कट्ट्यासह संग्राम जगताप जेरबंद; एलसीबीच्या कारवाईने उडाली खळबळ!
- जामखेड: फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सुटचे वाटप, अजय सातव मित्रमंडळाचा विधायक उपक्रम
- जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी, प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश
- मोठी बातमी : वाराणसी प्रकरणी सभापती राम शिंदे मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली मोठी मागणी
आज कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. चारही प्रभागात चुरशीचे मतदान होत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत शांततेच्या वातावरणात मतदान पार पडले. सध्या 60 टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चार जागांवर विक्रमी मतदान होण्याची शक्यता दिसत आहे.
